शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल संपेनात दोन दिवसाला एक लीटर बाटली, पाण्याची वाणवा, खाण्याचे आबाळ, क्षमतेपेक्षा जास्तीचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:10 IST

ठाण्यात महापालिकेने क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल अद्यापही संपले नसल्याचेच दिसत आहे. एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दिवस पुरवून घ्यावी लागत आहे. खाण्या, बरोबर इतरही सुविधा मिळत नसल्याने येथील नागरीक हैराण झाले आहेत.

ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरन्टाइन केले जात आहे. परंतु आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक क्वॉरन्टाइन करण्यात आले असल्याचा धक्कादायक आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी पाण्याचे बाटले भरुन ठेवले गेले आहेत, परंतु त्यामुळे एकामुळे दुसºया लागण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दोन दिवस करुन पुरवावी लागत आहे. खाण्याचे आबाळ सुरु असून, तपासणी देखील वेळेवर होतांना दिसत नसल्याची गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.                    ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला आळा घालण्यात आला पालिका प्रशासन आणि सिव्हील रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहरात आजच्या घडीला २३० वरुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे त्यांना क्वॉरन्टाइंन केले जात आहे. त्यामुळे येथील संशयीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरुपाची पुर्तता वेळचे वेळी होतांना दिसत नाही. नागरीकांचे हाल आता सुरु झाले आहेत. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असतांना एका नागरीकाला दोन दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरविली जात आहे. त्यामुळे पाण्याविना संशयीतांचे हाल सुरु झाले आहेत. शिवाय काही ठिकाणी पाच पाच लीटरचे बाटले ठेवण्यात आले असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. जेवण वेळेवर मिळत नाही. तेही आम्ही मान्य करु परंतु एखाद्याला जास्तीचा त्रास सुरु झाला तरी देखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयींताना देखील उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे माहिती येथील क्वॉरन्टाइन झालेल्या संशयीतांनी व्यक्त केली आहे. तपासणी वेळवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरीक इतरांच्याही संपर्कात येऊन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ही एकप्रकारे भरच पडत आहे.दरम्यान दुसरकीडे क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक येथे ठेवण्यात आल्याचा आरोप राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सोई सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात जगदाळे यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला असून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील शासनाला व्हिडीओद्वारे विनंती केली असून शक्यतोवर शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करावेत अशी मागणी केली आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्याचे बील हे दिड ते दोन लाख जात आहे. हे बील भरणेही लॉकडाऊमुळे शक्य होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमाईचे साधन नसल्याने एखाद्या रुग्णाने एवढे महागडे बील कसे भरायचे, असा सवाल त्यांनी केला असून आता ही एकप्रकारची लुट असून यातही भष्टÑाचार सुरु झाला की काय अशी शक्यताही निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे शासनाने याची वेळेत दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोनावर उपचार घेणाºया रुग्णांबरोबर संशयीतांचेही हाल होतांना दिसत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या