शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील एक लाख बालकांचे रविवारी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 16:26 IST

Vaccination: जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकांना जवळच्या बुथवर घेऊन जाणे आवश्यक

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ७६० बालकांसाठी उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. 

            जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकांना जवळच्या बुथवर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे. यासाठी मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुकाणू समितीची खास बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या खास उपस्थितीत पार पडली त्यांनी जिल्ह्यातील उपस्थित डाँक्टरांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी, सर्वेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. जळगावकर आणि मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 

         या मोहिमेत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यास अनुसरुन आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नऊ हजार ४१८ कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यात एक हजार ७५ बूथ  उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दोन हजार ६२९ पथकांसह ५२६ पर्यवेक्षक पथक तयार केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी २१५ बूथ पर्यवेक्षकांचे असणार आहेत. तर १५७ मोबाईल पथकही तैनात राहणार आहेत.

टॅग्स :thaneठाणे