शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 04:26 IST

Bhiwandi News : भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली.

भिवंडी - भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.दापोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळमजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कंपनी आहे. या कंपनीत ऑनलाइन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे ७० हून अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून, सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे ५० ते ५५ कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स ही टीव्ही व इलेक्ट्राॅनिक साहित्याची कंपनी होती. ज्यात सहा ते सात कामगार काम करत होते. टीव्ही कंपनीतील हे सर्व कामगार सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे, तर गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर बेकायदा बांधकामही सुरू होते. हे मजूर थाेडक्यात वाचले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे तळमजल्यावर काम सुरू असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत गोंधळ उडाला. यावेळी २५ ते ३० कामगार धावत बाहेर पळाले. दुर्घटनेत सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी, शैलेश तरे व इतर एक असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. नारपाेली पाेलीस ठाण्यात या दुर्घटनेची नाेंद करण्यात आली आहे.  २५ जणांना वाचविणाऱ्याचाच गेला जीव  कंपनीतील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षारक्षक सौरभ त्रिपाठी (वय ३०) याने सुमारे २० ते २५ लोकांना बाहेर काढले; मात्र कामगारांना बाहेर काढताना ताेच ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. इतरांना वाचवणाऱ्या त्रिपाठीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी