शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शंभर भूखंड अतिक्रमणमुक्त; प्रांत अधिकाऱ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:42 IST

उल्हासनगरमध्ये भूमाफियांमध्ये उडाली खळबळ

उल्हासनगर : शहरातील खुल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रांत अधिकारी जगजितसिंग गिरासे यांनी एका वर्षात १०० पेक्षा भूखंड सरकारच्या ताब्यात आणले आहेत. सरकारी भावानुसार या भूखंडांची किमत २०० कोटीपेक्षा अधिक असली तरी बाजारभावानुसार या भूखंडांची किमत ५०० कोटीच्या वरती असल्याचे सांगण्यात आले. प्रांत अधिकाºयांच्या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. कॅम्प नंबर तीन धर्मवाडी परिसरातील अशाच एका फलकावर काळे फासून संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी केल्याची माहिती गिरासे यांनी दिली.उल्हासनगरमध्ये जागेच्या मालकी हक्काबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागेच्या मालकी हक्काअभावी विकास ठप्प पडल्याचा आरोप सत्ताधाºयांबरोबरच विरोधकांनीही केला होता. महापौर पंचम कलानी यांनी सरकारकडे काही भूखंडाच्या मालकी हक्काबाबत मागणी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी आयडीआय कंपनीजवळील आरक्षित भूखंडासह बोटक्लब, इंदिरा गांधी भाजीमार्केट व व्हीटीसी ग्राऊंड अशा चार भूखंडाची मालकी हक्क महापालिकेला हस्तांतरीत केली. ओटी सेक्शन धर्मवाडी परिसरातील जागेवर एका संस्थेने नामफलक लावला होता. प्रांत अधिकारी कार्यालयाने जागेबाबत संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी करून बोर्डाला काळे फासले आहे.महापालिकेच्या ७० ते ७५ टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असून भूखंडाच्या मालकी हक्काच्या वादामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता आली नाही. शहरात बनावट सनदेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारने सनद देणे बंद केले. शहरातील खुल्या व मोकळे भूखंड सरकारकडे जमा करण्याचा विडा प्रांत कार्यालयाने उचलला आहे. एका वर्षात कोट्यवधी किंमतीच्या १०० पेक्षा जास्त खुल्या जागा व भूखंडावर राज्य सरकारचे नामफलक लाऊन जागा सरकार दरबारी जमा केल्याची माहिती गिरासे यांनी दिली. भविष्यात ही जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असून शहर विकासाला हातभार लागणार आहे, असे गिरासे यांनी यावेळी सांगितले. पालिकेला येथील अतिक्रमण तातडीने पालिकेला हटवावी लागणार आहेत. किमान हे भूखंड मोकळा श्वास घेतील अशी प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.सनदेचा तिढा सुटता सुटेनाशहरातील खुल्या जागेवर १९६० पूर्वी कोणी ताबा दाखविला असल्यास त्या जागेला कागदपत्राच्या आधारे राज्य सरकार सनद म्हणजे मालकी हक्क देते. मात्र बोगस सनदेचा सुळसुळाट झाल्यावर सरकारने सनद देणे बंद केले. तरीही अनेक जागेची सनद भूमाफियांनी यापूर्वीच काढल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणulhasnagarउल्हासनगर