शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ आश्रमशाळेत राहून कृषी अधिकाऱ्यांकडून पायंडा!

By सुरेश लोखंडे | Updated: September 2, 2022 19:16 IST

राज्य शासनाने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू केला आहे.

ठाणे: राज्य शासनाने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांसमवेत तीन दिवस राहून त्यांचे सुख, दु:ख, अडीचणी, त्यावरील उपाय आदीं जाणून घेणार आहे. या दौर्याप्रसंगी आग्रह केला तरी शेतकऱ्यांच्या घरी, अन्यत्र कोठे रात्रीचे वास्तव करून टीका ओढवून न घेता या उपक्रमाच्या पहिल्याच दिवसापासून सर्व कृषी अधिकाऱ्यांची स्वतः रात्रीच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा आश्रमशाळेत राहून पायंडा घालून दिला आहे, असे कोकण विभागीय कृषी उपायुक्त अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.

या उपक्रमास अनुसरून लोकमतने ‘बर्मुडा, टीशर्ट घालून ‘साहेब’ राबणार शेतात’ या मथळ्याखाली २ सप्टेंबर रोजी वृत्तप्रसिध्द करून या दौऱ्याातील अधिकारी फार्म हाऊसमध्ये राहून दौरा पूर्ण करणार की काय अशी शंका व्यक्त केली होती. मात्र अशी शंका कूशंका येणार असल्याचे आधीच लक्षात घेऊन या उपक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी एक दिवस आधीच म्हणजे ३१ आॅगस्टला कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याामधील केवनाळ-सूर्यमाळ येथील आश्रम शाळेत व विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्रीचा मुक्कम केला, असे माने यांनी लोकमतच्या लक्षात आणून दिले.   शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, विविध समस्याा प्रशासनाने समजून घेत त्यावर कोणत्या उपाययोजना,धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी राज्य शासनाने प्रशासनातील राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना  आता महिन्यातून तीन दिवसव महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकºयांनी महिन्यातून एक दिवस शेतकºयांसोबत शेतात घालवायचा आहे. गावांना भेटी द्यायच्या आहेत. यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’हा उपक्रम १ सप्टेंबर  ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीसाठी सुरू केला आहे. पण हा उपक्रमही अधिकारी पिकनिक दिन किंवा शेतावरील सहल म्हणून घालवतील असे लोकांमध्ये ऐकायला  मिळत आहे. पण कृषी विभागाच्या या आधीकाºयांनी पहिल्या दिवसांपासूनच शेतकºयांच्या घरी, किंवा फार्म हाऊसमध्ये न राहता गांवातील शाळेत रात्री वास्तव्याला राहून कर्तव्य बजावण्याचा पायदा या उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केला असल्याचे माने यांनी लोकमतला सांगितले.‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’या उपक्रमाचा पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागामधील मोखाडा तालुक्यातील सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी रात्री मुक्काम केल्याचे वास्तव छायाचित्र.

टॅग्स :thaneठाणे