शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 01:07 IST

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिलीप आणि दीप्ती नाईक या दाम्पत्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिलीप आणि दीप्ती नाईक या दाम्पत्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.नाईक दाम्पत्याने जून २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये भायखळा येथील बिपिन जाधव (४२) यांच्या रुद्रा ग्रुप या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात येऊन टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या क्षेत्रात काम करत असल्याची बतावणी केली. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार केल्यास कंपनीचा फायदा होणार असल्याचाही दावा केला. पहिल्या व्यवहारात जाधव यांचा त्यांनी विश्वास संपादन करून इतर प्रवाशांच्या तिकीट आणि राहण्याचा खर्चाची रक्कम जाधव यांच्या कंपनीकडून उधारीवर (क्रेडिट) घेतली.या व्यवहारामध्ये जाधव यांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत या व्यवहारातील एक कोटी ३४ लाख ९५ हजार २४५ रुपये इतकी रक्कम परत न देता नाईक दाम्पत्याने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नाईक यांच्याकडे या रकमेसाठी तगादा लावूनही त्यांनी ती परत न केल्याने अखेर जाधव यांनी २५ मे रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी