शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ९० एमडी पावडरसह एकाला अटक; एमडी पावडरची किंमत ६ लाख ३४ हजार 

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2023 20:30 IST

शहर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत.

सदानंद नाईक,  उल्हासनगर : कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील आयडीआय कंपनीच्या गेटसमोर १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पवन सुशील झा याला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ४० ग्राम एमडी पावडरसह अटक केली होती. पोलीस कस्टडीतील चौकशीत त्याच्याकडे पुन्हा ५० ग्राम एमडी पावडर मिळून आली असून शहर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत.

 उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड स्टेशन आयडीआय कंपनीच्या गेटनसमोर १४ सप्टेंबर रोजी रात्री एक जण एमडी पावडर विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाने आयडीआय कंपनी गेट परिसरात सापळा रचून संशयितरीत्या फिरणाऱ्या पवन सुशील झा-१९ या तरुणाला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी दिली. पोलीस कस्टडी दरम्यान चौकशीत पवन झा याने आयडीआय कंपनी परिसरात लपून ठेवलेल्या ५० ग्राम एमडी पावडरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांना दिली. त्यांनी ५० ग्राम एमडी पावडर हस्तगत केली. आतापर्यंत एकून ९० ग्राम एमडी पावडर जप्त हस्तगत करून त्याची किंमत ६ लाख ३४ हजार आहे.

 शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे अधिक तपास करीत असून यामागे मोठया माश्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. अटक आरोपी पवन झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडे एमडी पावडर कशी आली. याचा शोध पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर