शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये करणार दीड हजार खाटांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:44 IST

विजय सिंघल : महापालिकेच्या विविध सुविधा केंद्रांचा करणार वापर

ठाणे : ठाणे महापालिकेने विविध विविध प्रयोजनासाठी जी मोठमोठी सुविधार केंद्रे उभारली आहेत, त्यांचे रुंपातर कोरोनासाठी खास रुग्णालये किंवा क्वॉरंटाइन केंद्रात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी लोकमतशी बोलतांना दिली. यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब, स्टेडियम बॅडमिंन्टन हॉल, ब्रम्हाड दोस्ती होम, हाजुरीमध्ये कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरचा समावेश असून त् ठिकाणी विशेष बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची राज्याच्या कमिटीने पाहणी केल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तर शहरातील इतर खाजगी रुग्णालयेदेखील कोरोनासाठी वापरता येतील, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये १५०० बेडची सुविधा केली जाणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत शहरात रोज १५ ते २० रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे हा आकडा ३०० च्या जवळ जाऊन पोहचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरूआहेत.रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांच्या संपर्कात येत असलेल्या क्वॉरंटाइन करून ठेवण्यात येत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे यावर ठोस उपाय योजण्याचे निश्चित केले आहे. रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी, क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात येत असलेल्यांसाठी योग्य ती सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. यानुसार आता साकेत येथे असलेल्या ग्लोबल इन्पॅक्ट हब या ठिकाणी १५०० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासगी रुग्णालयांची यादी करण्याचे काम सुरूयाशिवाय स्टेडियमध्ये बॅडमिंटन हॉल असेल तसेच त्या ठिकाणी असलेले इतर हॉल असतील येथेही बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ब्रम्हाड येथील दोस्तीच्या घरांमध्येही अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तर हाजुरी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरच्या ठिकाणीदेखील विशेष बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय काही खाजगी हॉस्पीटलदेखील आता याच आजारावर उपचार करण्यासाठी राखीव ठेवली जाणार असून त्यांची यादीही तयार करण्याचे काम सुरूअसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.