शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दीडशेच्या सभागृहात ४०० मुख्याध्यापकांना ‘कोंडले’, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:52 IST

इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ठाणे शिक्षण उपसंचालक कार्यालया

कल्याण : इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ठाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बुधवारी पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयात घेतलेल्या कार्यशाळेत मुख्याध्यापकांची जागेअभावी चांगलीच परवड झाली. कार्यशाळा संपेपर्यंत बहुतांश मुख्याध्यापकांना उभे राहावे लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेनेही शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.बिर्ला महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. याप्रसंगी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर यासह जवळपासच्या शहरांमधून चारशेच्या आसपास मुख्याध्यापकांनी उपस्थिती लावली.अकरावी आॅनलाइन प्रक्रिया कशी चालते, याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. साधारण सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यशाळेत मुख्याध्यापकांना हॉलमध्ये बसण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे नंतर आलेल्या मुख्याध्यापकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. कार्यशाळा संपेपर्यंत अनेकांना हॉलच्या बाहेरच अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. तर, काहींवर हॉलमध्ये जमिनीवर बसण्याची नामुश्की ओढवली. काही व्यासपीठावरही जाऊन उभे राहिले होते. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर पुढच्या वेळेस दोन विभागांत कार्यशाळा घेतली जाईल, असे सांगत आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.हॉलची क्षमता १५० ते २०० असताना या कार्यशाळेला चारशेच्या आसपास मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. सोमवारी मुंबईत माटुंगा येथे पार पडलेल्या कार्यशाळेच्या दरम्यानदेखील ही समस्या उद्भवली होती. याची पुनरावृत्ती झाल्याचे बुधवारी कल्याणमध्ये पाहावयास मिळाले.