शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 10:59 IST

Parambir Singh: ९ ऑगस्टला होणार सुनावणी, आरोपींना मोक्का लावण्याची फिर्यादींची मागणी

ठाणे : ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील सुनील देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामिनासाठी सोमवारी अर्ज केला. या अर्जाची सुनावणी येत्या ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, परमबीर यांच्यासह सर्वच आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी पोलिसांकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना आणि साक्षीदार क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी उकळल्याची तक्रार दाखल केली. मोक्काअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून त्यातून सुटकेसाठी आणि पोलिसांचा मार वाचविण्यासाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करून तत्कालीन निरीक्षक शर्मा यांनी ते स्वीकारल्याचा आरोप केतन यांनी केला.

या प्रकरणातील विकास दाभाडे आणि सुनील देसाई या दोन कथित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी २ ऑगस्ट रोजी अर्ज केला. मात्र, दाभाडे याने काही वेळातच आपला अटकपूर्व अर्ज परत घेतला. तर देसाई यांच्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. या अर्जावर पोलिसांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत आरोपी असलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांसह २८ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सहपोलीस आयुक्तांकडे केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. सागर कदम यांनी दिली.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगCourtन्यायालय