नालासोपारा (मंगेश कराळे) :- १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसांसह एका आरोपीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी पेल्हार गावातील पेल्हार हॉटेलच्या जवळ एक जण त्याच्या कब्जात विना परवाना बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र घेवुन येणार असल्याची खात्रीशिर बातमी पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती. सदर बातमीचे आधारे त्यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सदर विकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून शिताफिने एकाला ताब्यात घेतले. भव्य दवे (२५) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कब्जात १ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुस असा एकुण ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने, तो जप्त करण्यात आला आहे. पेल्हार पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), (२), ३३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, फिरोज तडवी, अविनाश देसाई, तानाजी चव्हाण, रवी वानखेडे, किरण आहार, निखील मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख यांनी केली आहे.