शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात तृतीय पंथीयसाठी कल्याण महामंडळ बनणार - आ. सरनाईक

By धीरज परब | Updated: September 12, 2022 20:37 IST

राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते.

मीरारोड - उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी ' तृतीयपंथी कल्याण महामंडळ ' स्थापन करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते. त्यांना शिक्षण , रोजगार वा व्यवसाय मध्ये स्थान दिले जात नसल्याने नाईलाजाने भीक मागण्याशिवाय त्यांच्या कडे पर्याय नसतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची कुचंबणा होते. सरकारी नोकऱ्यां मध्ये आरक्षण, पोलीस ठाण्यात स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी त्यांच्यासाठी स्वतंत्र बोगी, सरकारी अर्जामध्ये स्त्री, पुरूष याप्रमाणेच किन्नर असा तिसरा कॉलम असावा, यासह रोजगार, घर, शिक्षण आदी बाबतच्या त्यांच्या अनेक मागण्या संघटनाच्या वतीने केल्या जात आहेत या कडे आ . सरनाईक यांनी लक्ष वेधले.

तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने ’उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची“ स्थापना केली आहे . त्याच धर्तीवर किन्नरांच्या कल्याण व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण, रोजगार, घर योजनांसाठी महाराष्ट्रात सुद्धा ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन होणे आवश्यक आहे. किन्नरांच्या मागण्या व  त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा बनविणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत महामंडळाची गरज असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते असे आ. सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकTransgenderट्रान्सजेंडर