शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे

By नितीन पंडित | Updated: August 9, 2024 17:46 IST

मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गाचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालक, प्रवासी,चाकरमानी विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवास यातनामय झालेला असताना मुंबई नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याने नागरिक व प्रवाशांची अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले. या पाहणी दौऱ्यात आमदार शांताराम मोरे,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून यावर उपाय म्हणून अवजड वाहने वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्या पूर्वी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली.मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी येण्याच्या काही तास आधी पडघा टोल व्यवस्थापन व रस्ते विकास महामंडळ व बांधकाम प्रशासनाकडून तातडीने खड्ड्यांवर थातुर मातुर मलमपट्टी करण्यास सुरवात केली होती.या घाईघाईच्या खड्डे भराईच्या कामाचा स्थानिक नागरिकांनी प्रशासन टोल व्यवस्थापन कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbhiwandiभिवंडी