शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 3, 2023 15:57 IST

सेंट्रल मैदानात आज खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर विजय इंदप क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक आणि स्वप्नील दळवीची धुवांधार अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय इंदप क्रिकेट क्लबने राज क्रिकेट अकॅडमीचा सहा विकेट्सनी पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

सेंट्रल मैदानात आज खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर विजय इंदप क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ओमकार रहाटे आणि स्वप्निल दळवी या सलामीच्या जोडीने हल्लाबोल करत राज क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांना पुरते हतबल करुन टाकले. या दोघांनी १०.४ षटकात पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. ओमकारने ७३ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ११२ धावांची शतकी खेळी केली. तर स्वप्नीलने ३४ चेंडूत ८३ धावा करताना आठ चौकार आणि सात षटकार ठोकले. अकनंन अन्सारीने १४ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत नाबाद २६ धावांसह ओमकारसोबत नाबाद १०५ धावांची डावातील दुसरी शतकी भागीदारी करत संघासाठी २० षटकात १ बाद २३१ धावसंख्या उभारली. या डावातील एकमेव विकेट अजय चौहानने मिळवली. उत्तरादाखल राज क्रिकेट अकॅडमीला २० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १०८ धावापर्यंत मजल मारता आली. मनोज भांडवलकरने ३९, अजय चौहानने २० धावा बनवल्या. विजय इंदप क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांना यष्टीपाठी १५ वर्षीय इशा मोकाशीने चांगली साथ दिली. मुलांच्या वरीष्ठ संघातून खेळताना इशाने प्रतिस्पर्ध्यांना अवांतर धावा घेऊ दिल्या नाहीत. स्वप्नील दळवीने दोन आणि देविदास शेडगे, अश्विन माळी, शित रंभिया आणि सचिन चव्हाणने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : विजय इंदप क्रिकेट क्लब : २० षटकात १ बाद २३१(स्वप्नील दळवी ८३, ओमकार रहाटे नाबाद ११२, अकनंन अन्सारी नाबाद २६, अजय चौहान ४-५९-१) विजयी विरुद्ध राज क्रिकेट अकॅडमी : २० षटकात ७ बाद १०८ ( मनोज भांडवलकर ३९, अजय चौहान २०, स्वप्नील दळवी ३-११-२, देविदास शेडगे ३-१-८-१, अश्विन माळी ३-१६-१, शित रंभिया ४-२०-१, सचिन चव्हाण ४-२६-१).

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :thaneठाणे