शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओमकार इंटरनॅशनल, विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जाणले ‘आई’चे महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:25 IST

जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेला आई तर आपण ज्या देशात राहतो त्याला मातृभूमी म्हणतो. त्या आईचे महत्व श्यामची आई च्या माध्यमातुन साने गुरुजींनी शंभर वर्षापूर्वी सांगितले होते. त्याच्या शतकोत्तर स्मृती वर्षानिमित्त डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘आई नावाचा देव’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्दे श्यामची आई स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आयोजन

डोंबिवली: जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेला आई तर आपण ज्या देशात राहतो त्याला मातृभूमी म्हणतो. त्या आईचे महत्व श्यामची आई च्या माध्यमातुन साने गुरुजींनी शंभर वर्षापूर्वी सांगितले होते. त्याच्या शतकोत्तर स्मृती वर्षानिमित्त डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘आई नावाचा देव’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात मंगळवारी संपन्न झालेल्या या उपक्रमात ओमकार इंटरनॅशनल, आणि विद्यानिकेतन शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी आईचे महत्व जाणले. प्रख्यात निवेदनकार मिलिंद कुलकर्णी यांनी मातेचे महत्व विषद करत विद्यार्थ्यांना बोलते केले. या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आई वर लिहिलेल्या कविता सादर केल्या. कवी फ.मु.शिंदे, कुसुमाग्रज यांच्यासह विविध साहित्यिकांच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा देण्यात आला. विठू माऊली तू, माझी रेणूका माऊली, आई भवानी तुझ्या कृपेने, वंदे मातरम्, आई जगदंबे जातो, जयोस्तुते, जयदेव जयदेव जयजय शिवराया, हे हिंदू नृसिंहा, सागरा प्राण तळमळला, ए वतन ए वतन, मेरा रंग दे बसंती चोला, तुु कितनी अच्छी है, ये तो सच है की भगवान है, अरे खोप्यामधी खोपा, निंबोणीच्या झाडामागे, ए आई मला पावसात भिजू दे, आई भवानी तुझ्या कृपेने, आणि माँ तुझे सलाम यांसारख्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना हा उपक्रम जास्त भावला. उपस्थित विद्यार्थ्यांना राज्यमंत्री चव्हाण, ओमकार शाळेच्या संस्थापिका दर्शना सामंत, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, अमित कासार, प्रभु कापसे आदींनी शुभेच्छा देत राष्ट्रप्रेम जागृत ठेवा असे आवाहन केले. स्वा. सावरकरांसह शहिद भगतसिंग, चाफेकर बंधू यांसह विविध स्वातंत्र्य विरांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर व्यक्त करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत राष्ट्रप्रेम व्यक्त केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे