शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओमी कलानी व भाजप उल्हासनगरात आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:42 IST

राजकारण तापले : नगरसेविकेचा मुलासह ओमी टीममध्ये प्रवेश

सदानंद नाईक     लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर  : भाजप नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी व मुलगा राजेश यांनी ओमी कलानी टीममध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप व ओमी कलानी आमने-सामने आले आहेत. दरम्यान, टेकचंदानी यांनी पक्षाकडे राजीनामा दिला नसल्याने त्या भाजपात असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असताना महापौर, उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपद शिवसेना महाआघाडीकडे गेले आहे. विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाला भाजपने उमेदवारी दिली नाही. याच्या निषेधार्थ भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराऐवजी शिवसेना व रिपाइंच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणले. तर, स्थायी समिती सभापती निवडणुकीत थेट भाजप बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना शिवसेनेने सूचक, अनुमोदन देऊन निवडून आणले. या प्रकाराने भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान, भाजपचे युवा नेते व माजी नगरसेवक राजेश टेकचंदानी यांनी त्यांच्या आई व भाजपच्या नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी यांच्यासह ओमी कलानी टीममध्ये प्रवेश केला. त्यांचे ओमी कलानी यांनी स्वागत केले.

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना सत्ता गेल्याने आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. तसेच पुरस्वानी यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पक्षातूनच जोर पकडू लागला आहे. भाजपमधील अनेक नगरसेवक संपर्कात असून नगरसेविका टेकचंदानी यांचा प्रवेश झांंकी है, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी देऊन भाजपला इशारा दिला. 

महापालिका निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असताना आतापासूनच निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. महापाैर, स्थायी समितीच्या निवडणुकीपासूनच भाजप व ओमी टीममध्ये वादाचे प्रसंग सुरु झाले आहेत.

शहर भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?महापालिकेच्या इतिहासात भाजपचे १५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व ओमी कलानी टीमची महाआघाडी झाल्यानेच भाजप महापालिकेत सत्तेपर्यंत पोहोचला. मात्र, यापुढे शहरात भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करू, अशी प्रतिक्रिया ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी दिली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर