शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ओम वर्तकनगर स्पोर्ट्स क्लब उपउपांत्य फेरीसाठी आज सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:36 IST

उपउपांत्य फेरीचे सामने आज रंगणार

विशाल हळदे, ठाणे: श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंती उत्सवा निमित्त ७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटात ज्ञान शक्ती युवा संस्था कल्याण, स्नेहविकास क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, स्फूर्ती सेवा मंडळ ठाणे, माऊली प्रतिष्ठान मुंबई उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ ठाणे ह्या संघानी उपउपांत्यपूर्व  फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात चिंतामणी क्रीडा संघ नवी मुंबई, अमर हिंद मंडळ मुंबई शहर, ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब ठाणे, ओवळी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंबिवली, उजाला क्रीडा मंडळ ठाणे, उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघानी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महिला गटातील सामन्यात कल्याणच्या ज्ञान शक्ती युवा संस्था संघाने मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ५५-५१ असा ४ गुणांनी पराभव करून  उपउपांत्यपूर्व  फेरीत प्रवेश केला.सामना सुरुवातीपासून अतिशय चुरशीचा झाला.मध्यन्तराला ज्ञान शक्ती युवा संस्था संघाकडे २१-२० अशी नाममात्र १ गुणांची आघाडी होती.मध्यांतरानंतर ज्ञान शक्ती युवा संस्था संघाच्या यतीक्षा बाबडे हिने अतिशय खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला पक्कडीत सानिया गायकवाड व निधी राजोळे हिने तोलामोलाची साथ दिली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.पराभूत संघकाडून चेतना बटावले हिने एकाकी झुंज दिली.

गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या स्नेहविकास क्रीडा मंडळाने ठाण्याच्या संकल्प क्रीडा मंडळाचा ४७-३२ असा १५ गणांनी पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या मध्यंतराला स्नेहविकास क्रीडा मंडळाने २३-११ अशी १२ गुणांची आघाडी घेतली ती मेघना खेडकर च्या उत्कुष्ट चढायांमुळे. उत्तरार्धात स्नेहविकास क्रीडा मंडळाने आपला आक्रमक खेळ तसाच पुढे चालू ठेवून सामना १५ गुणांनी जिंकला.

पुरुष गटातील पहिल्या सामन्यात ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय चुरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळाचा३०-२९ असा १ गुणांनी पराभव केला.ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाकडे मध्यंतराला १८-०६ अशी १२ गुणांची आघाडी होती ती जयेश यादवच्या खोलवर चढाया व त्याला पक्कडीत ओंकार फोफळणकरने दिलेल्या सुंदर साथीमुळे. मध्यंतरानंतर संघर्ष क्रीडा मंडळाकडून परशुराम पाटील व सुजित चव्हाण यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु ते आपल्या संघाला पराभव टाळू शकले नाहीत.दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या अमर हिंद मंडळाने नवी मुंबईच्या ग्रिफिन जिमखाना संघावर ३२-२८ असा ४ गुणांनी विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तो जयेश यादवच्या सुंदर अष्टपैलू खेळामुळे. मध्यंतराला अमर हिंद मंडळाकडे २१-१४ अशी ७ गुणांची आघाडी शेवटपर्यंत राखण्यात अमर हिंद मंडळाला यश मिळाले. पराभूत संघाकडून सुरज दुधळे याने उत्तम खेळ केला.                

  • १९/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला) : यतीक्षा बाबडे (ज्ञान शक्ती युवा संस्था, कल्याण ठाणे) 
  • १९/०४/२०२३ दिवसाची उत्कुष्ट पक्कड (महिला)  : नयना झा (माऊली प्रतिष्ठान, मुंबई उपनगर)
  • १९/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : जयेश यादव (अमर हिंद मंडळ,  मुंबई शहर)
  • १९/०४/२०२३ दिवसाची उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : विजय चव्हाण   (छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ, डोंबिवली)