शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वटवृक्षाचा घोटला गळा?, पर्यावरणप्रेमी नागरिकाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:28 IST

३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचा गळा घोटण्याचे काम सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या माध्यमातून सुरू असल्याची बाब ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकाने उघडकीस आणली आहे.

ठाणे : ३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचा गळा घोटण्याचे काम सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या माध्यमातून सुरू असल्याची बाब ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकाने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी रोहीत जोशी यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबधीत विकासकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या प्रकल्पाचे काम सुरूआहे. परंतु, या ठिकाणी २०० फुटांचा घेर असलेला आणि ३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचे आयुर्मान संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याठिकाणी संबधींत विकासकाकडून या वृक्षाला बंदीस्त करण्यात आले असून बाजूला सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. त्याचे पुरावे सुद्धा जोशी यांनी आयुक्तांना दिले आहेत. मुळात हे वृक्ष जुने असल्याने त्याला हेरीटेजचा दर्जा देण्याची मागणी हरियाली संस्थेच्या पुनम सिंघवी यांनी केली होती. परंतु,अद्यापही त्यांची ही मागणी मान्य झालेली नाही. असे असले तरी आता संबधींत विकासकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात येत्या १ जून रोजी आंदोलन करण्यात येणार असून २ जून रोजी शहरातील विविध सामाजिक संस्था, दक्ष नागरिक यांना शहरातील अशा १०० वर्षे जुन्या वृक्षांची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

> ज्या वृक्षासंदर्भात तक्रार आलेली आहे, त्यासंदर्भात कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही, किंवा आम्ही दिलेली नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे. त्या वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. बाजूला खड्डा खोदण्यात आलेला आहे.- अनुराधा बाबर, वृक्ष प्राधिकरण अधिकारी - ठामपा