शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत जुन्या मुंबईची चित्रकृती सरस; निवडक चित्रांचे प्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:25 IST

ज्येष्ठ चित्रकार अध्यापक अनिल नाईक यांनी या कलादालनाला भेट दिली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त क्रिशिता सालियान यांनी काल कलादालनला भेट दिली.

बदलापूर  : बदलापूर आर्ट गॅलरीतर्फे ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यासह हैदराबाद, आसाम, आगरतळा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून विविध भागांतील चित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतल्याची माहिती आयोजक माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली. या स्पर्धेत क्रीशिता सालियान यांनी रेखाटलेल्या जुन्या मुंबईच्या चित्रकृतीला प्रथम क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

ऑनलाइन स्पर्धेत १५० चित्रकारांचा सहभाग होता. यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन बदलापूर येथील कला दालनात भरविण्यात आले आहे. महिनाभर हे कलादालन विनामूल्य खुले राहणार असल्याचे घोरपडे आणि समितीच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे यांनी सांगितले. क्रिशिता सालियान यांनी रेखाटलेल्या जुन्या मुंबईच्या चित्रकृतीस ५० हजारांचे पारितोषिक घोरपडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येकी दहा हजार रुपयांची पाच पारितोषिके उल्लेखनीय चित्रांना दिली जाणार आहेत. अनिल नाईक, डॉ. जॉन डग्लस, वर्षा खरटमल, श्रीकांत कदम आणि संजय शेलार या नामवंत चित्रकारांनी पाहुणे कलावंत म्हणून या राष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती मांडल्या आहेत. क्रिशिता कृष्णा सालियान, विनीता चेंदवणकर, पूजा शेळके म्हात्रे, मोनिका घुले, निहार सुतार आणि योगेश बर्वे यांच्या कलाकृतींना पारितोषिके जाहीर झाली आहेत.  ज्येष्ठ चित्रकार अध्यापक अनिल नाईक यांनी या कलादालनाला भेट दिली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त क्रिशिता सालियान यांनी काल कलादालनला भेट दिली. बदलापूर येथील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

इतर चित्रांचेही प्रदर्शन टप्प्याटप्प्याने२८ नोव्हेंबरला सायंकाळी या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले. सध्या विजेत्या ११ कलाकारांच्या कलाकृती यात पाहता येणार आहेत. महिन्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी निवडक चित्रांचे प्रदर्शन टप्प्याटप्प्याने पुढे कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे निवड समितीच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे यांनी सांगितले.