शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेकडील जुन्या डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 16:52 IST

प्रवासी हेच आमचे दैवत असे मानले तरीही प्रचंड ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली: प्रवासी हेच आमचे दैवत असे मानले तरीही प्रचंड ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासन काही करत नाही, ना लोकप्रतिनिधी त्यामुळे रिक्षाचालकांनीच कंटाळून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेत जुनी डोंबिवली येथील रिक्षा चालकांनी गुरुवारी संध्याकाळी खड्डे बुजवले.२५ वर्षे जुना असलेल्या स्टँडमधील सुमारे २०० रिक्षा चालक अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात. त्यामुळे परिसरातील हजारो प्रवासी त्यांच्या परिचयाचे आहेत. पण रस्त्यांवरील खड्डेच प्रचंड असल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टँड प्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अ‍ॅनेक्स फर्नांडीस, अरुण कोचरेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही, तो प्रश्न अनेक वर्षे सुटलेलाच नाही. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात माहित नाही. पण समस्या आहे हे उघड आहे. त्यामुळे गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, बालक हे प्रवासी म्हणुन आले की पोटात गोळा येतो. खड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे हा मोठा ताण असल्याचे कोचरेकर सांगतात. पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षा चालकांचे अंग दुखते, त्यांना कंबर दुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. अशा अवस्थेत खड्डयांमधून रिक्षा गेल्यावर गाडीचे नुकसान होते, शरिराची हेळसांड होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारपासून साधारण २० खड्डे बुजवले असून त्यामध्ये ्नजोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील मोठे खड्डे बुजवले. परंतू जुनी डोंबिवली ते गिरजामाता मंदिर परिसरात १० इंचाचे खड्डे झाले आहेत, ते भरणे कठीण आहे.जेथे खड्डे बुवले त्यात परिसरातील डेब्रिज टाकण्यात आले. डेब्रीज टाकुन समस्या सुटणार नाही हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी, आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो हे समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक विभाग, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्ये कडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे अशी मागणीही त्यांनी केली. कोचरेकर आणि पंडित यांनी खड्डे बुजवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून सहकारी रिक्षा चालकांनी त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार शुक्रवारी जेथे जास्त खड्डा मोठा आहे तो बुजवण्यासाठी सामान गोळा करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरुन ग्राहकांना सुविधा देता येईल, आमचे आरोग्य राखले जाईल असेही रिक्षाचालक म्हणाले.