शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:35 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क किन्हवली : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, बदललेल्या हवामानामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत दोन दिवस शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे ग्रामीण भागातील चरीव, अदिवली, आष्टे, मुसई, बर्डेपाडा, अस्नोली, अंदाड, लेणाडसह अनेक गावांतील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकंदरीत ढगाळ वातावरण, धुके व अवकाळी पाऊस याचा मोठा परिणाम उत्पादन व बाजारभावावर होणार आहे. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. भेंडीबरोबरच हरभरा, काकडी, मिरची व टोमॅटो या पिकांनाही पावसाचा फटका बसला असून अतिपावसामुळे बुरशी व इतर रोगांमुळे उत्पादनात घट होणार आहे.लागवडीसाठी महागडे बी-बियाणे, खते, औषधे, मजूर यासाठी खूपच खर्च येतो. उत्पादनातून होणारा खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी आहेत. तालुक्यात अनेक बेरोजगार वीटभट्टीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकचा खर्च करून हा व्यवसाय करीत असताना सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे विटांचे खूप नुकसान झाले असून वीटभट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत आहेत. 

भेंडीचे बियाणे चार ते पाच हजार रुपये किलो आहे. लागवडीसाठी इतरही खूपच खर्च येतो.  हा खर्च कसा भरुन काढायचा  असा  प्रश्न आहे. अवकाळी पावसाने साहजिकच उत्पादन कमी होणार असून उत्पन्नही कमी होणार आहे. त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार आहे.    - तुषार पानसरे,     शेतकरी, चरीव 

टॅग्स :thaneठाणे