शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:13 IST

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

ठाणे : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आधीच हिवाळ््यातील गारवा आणि त्यात पावसामुळे रहिवासी आणखीनच गारठून गेले. या वादळामुळे अनेक शाळा बंद राहिल्या. पावसाने वाहतूकही मंदावली आणि सर्व शहरे काही काळ ओकीबोकी झाली.ठाण्यात २०१० नंतरच्या दुसºया क्रमांकाच्या पावसाची नोंद या ओखीमुळे झाली. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. त्यामुले ठाणे शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ठाणे आपत्ती विभागाकडे १२ तक्रारी आल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉर्टसर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर सहा अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. कोपरीत खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाºया घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला देण्यास सुचवले होते. जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे त्यात म्हटले होते. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील देण्यात आल्या.भाजीपाला लागवडीला, अन्य पिकांना या पावसाचा फटका बसल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात पावसाने सुधारणा झाली. मात्र त्याची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली नाही.प्रचाराला पहिल्याच दिवशी पावसाने दिला फटकाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचे अतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचार सुरू होईल, अशी स्थिती होती, पण ओखी चक्रीवादळाने बदललेल्या हवामानाने त्यावर पाणी पडले. प्रचाराच्या नियोजनाची धूळधाण उडाली. कार्यकर्तेच गोळा होऊ न शकल्याने उमेदवारांना स्वत:च फिरून जमेल तेवढा प्रचार करावा लागल्याची माहिती पाचही तालुक्यांतून हाती आली आहे. ओखी चक्रीवादळामुळे शाळांना सुटी देण्यात आली. तरीही काही शाळा पूर्ण किंवा अर्धा दिवस सुरू असल्याने कुटुंबे घरात अडकून पडली. सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही दिवसभर अधूनमधून पडत होता. त्यामुळे शेती, पिकांवर लक्ष ठेवण्यात शेतकरी गुंतून गेले. भाजीपाल्याचे पीक घेणाºयांना या पावसाने तडाखा दिला. त्याच्यासह अन्य पिकांबाबत अंदाज घेण्याचे शेतकºयांचे काम दिवसभर सुरू होते.त्यामुळे ज्यांच्यासाठी प्रचार करायचा तेच जागेवर नसल्याने उमेदवारांचा विरस झाला. त्यातही अनेकांचे कार्यकर्तेच जमले नाहीत. खास करून महिला घरात, पावसामुळे कामात अडकून पडल्याने त्याही बाहेर पडल्या नाहीत. त्याचा फटका प्रचाराला बसला. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ