शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील वाहतुक व्यवस्थेमध्ये नियोजन करण्यासाठी नगराध्यक्षांनी घेतली अधिका-यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:06 IST

वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती.

ठळक मुद्देअंबरनाथ शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल पोलीस, परिवहन आणि वाहतुक विभागाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक स्टेशन रोडवरील रिक्षा स्टँड आणि पार्किगची समस्या सोडविण्यावर सविस्तर चर्चा

अंबरनाथ -अंबरनाथ शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज असल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी पोलीस, परिवहन आणि वाहतुक विभागाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक पालिकेत घेतली. या बैठकीत स्टेशन रोडवरील रिक्षा स्टँड आणि पार्किगची समस्या सोडविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.          अंबरनाथ शहरात रस्ते रुंद झालेले असले तरी वाहतुक कोंडी आणि पार्किगची समस्या मात्र कायम आहे. त्यातच अधिकृत रिक्षा स्टँड नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी देखील वाढली आहे. या सर्वाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वाहतुक विभागाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम विभागाचे पोलीस अधिकारी हजर होते. यावेळी मुळ समस्यांवर चर्चा झाल्यावर त्या सोडविण्यासाठी काय करावे यावर चर्चा करण्यात आली. पश्चिम भागातील स्टेशनला जोडणो महत्वाचे रस्ते सर्वात आधी सुरु करण्यावर निर्णय घेण्यात आला. तसेच स्टेशन रोडला समांरत जे रिक्षा स्टँड उभारण्यात आले आहे ते स्थलांतरीत करण्यावर ठोस निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ पूर्व भागात बी केबीन रोडवर जे अनधिकृतपणो दोन रिक्षा स्टँड उभारण्यात आले आहे ते हनुमान मंदिराच्या पुढे स्थालांतरीत करण्यावर एकमत झाले. सोबत मुख्य स्टँडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यावर चर्चा करण्यात आली. या सोबत अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील पार्किगची समस्या सोडविण्यासाठी सर्व वाहनचालकांना पालिकेच्या पार्किग विभागात गाडय़ा पार्क करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. शिवाजी चौकातील सर्व पार्किग चव्हाण नाटय़गृहाच्या तळमजल्यावर करण्यावर एकमत झाले. वाहतुक विभागाने देखील बेकायदेशिर पार्किगवर कारवाई करावी अशी सुचना वाळेकर यांनी केली.     अंबरनाथ पालिकेने वाहतुक व्यवस्थेत काय सुधारणा करता येतील यावर आधारीत प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यासाठी सर्व सुचना त्यामध्ये करण्यात आले आहे. मात्र या सभेत जे निर्णय घेण्यात आले आहे त्याची अमलबजावणी पालिका प्रशासन कधी करणार यावकडे सर्वाचे लक्ष लागुन राहिले आहे.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथMuncipal Corporationनगर पालिका