शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांनी चक्क नगरसेवकांनाही गुंडाळून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:26 IST

मागील तीन वर्षांत मीरा-भार्इंदर महापालिकेच्या १३ नगरसेवकांनी एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागात ३९ माहिती अधिकाराचे अर्ज टाकल्याची बाब समोर आली आहे

मीर रोड : मागील तीन वर्षांत मीरा-भार्इंदर महापालिकेच्या १३ नगरसेवकांनी एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागात ३९ माहिती अधिकाराचे अर्ज टाकल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाकडून नगरसेवकांनाच उत्तरे दिली जात नसल्याने माहिती अधिकाराचा वापर त्यांनाही करावा लागला. विशेष म्हणजे काही नगरसेवकांना तर माहिती अधिकारातही उत्तरे दिली गेली नाहीत. अन्य विभागांत नगरसेवकांनी टाकलेल्या माहिती अधिकार अर्जाची माहिती देण्यास टोलवाटोलवी होत असल्याने अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्ण गुप्ता याने पालिकेकडे तीन वर्षांत खासदार, आमदार, नगरसेवक यांनी दिलेल्या माहिती अधिकार अर्जांचा तपशील मागितला होता. परंतु, फक्त पालिकेच्या बांधकाम विभागानेच याबाबतची माहिती दिली असून यामध्ये एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१८ या तीन वर्षांत १३ नगरसेवकांनी ३९ माहिती अधिकारात अर्ज केले असल्याचे उपअभियंता किरण राठोड यांनी लेखी दिले आहे. यात मदनसिंह, सय्यद नूरजहाँ हुसेन, डॉ. राजेंद्र जैन, दिनेश जैन, नीला सोन्स, परशुराम म्हात्रे, दीप्ती भट, प्रमोद सामंत, सुजाता शिंदे, वेंचर मेंडोन्सा, अश्विन कासोदरिया, मेघना रावल, दीपिका अरोरा या १३ नगरसेवकांचा समावेश आहे. यातील सामंत, शिंदे हे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मेंडोन्सा निवडणूक लढले नव्हते.सोन्स यांनी नगरसेवक निधीबाबतची माहिती मागितली, तर मदन सिंह यांनी पालिकेच्या स्थावर जंगम मालमत्तांची माहिती मागितली होती. परशुराम म्हात्रे यांनी पेणकरपाडा भागातील स्वच्छतागृह चालवण्याबाबतची माहिती मागितली होती. यातील सामंत यांनी १६, तर भट यांनी नऊ माहिती अधिकार अर्ज टाकले होते. शिंदे यांनीचार तर डॉ. जैन यांनी दोन अर्ज टाकले होते. पण, माहिती अधिकारात यातील बहुतांश नगरसेवकांनादेखील वेळेत माहिती मिळालेली नाही. काहींना तर अजूनही माहिती दिली गेलेली नाही.बांधकाम विभागाव्यतिरिक्त नगररचना, पाणीपुरवठा, आरोग्य, आस्थापना, उद्यान, अतिक्रमण आदी अनेक विभागांमध्येही नगरसेवकांनी माहिती अधिकारात अर्ज टाकले असून त्यांची माहिती मात्र अद्याप अर्जदारांस दिलेली नाही. ती माहिती मिळाल्यास माहिती अधिकाराचा वापर करणाºया नगरसेवकांची संख्या आणखी वाढणार आहे.दरम्यान, प्रशासनाच्या या कारभारावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.