शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचा-यांना उपस्थितीची राहण्याची सक्ती, अन्यथा होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:28 IST

मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंह भुयारी मार्गाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाईंदर पश्चिम येथे येणार आहेत. वास्तविक आधी हा एकच कार्यक्रम घेण्यात आला होता. पण आज अचानक मीरारोड रेल्वे स्थानक परिसरच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रमदेखील घेण्यात आला आहे. भार्इंदर येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मीरारोडला जातील.उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना पत्र काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे. कार्यक्रमास उपस्थित न राहणारया अधिकारी - कर्मचारयांवर कारवाईचा इशारा म्हसाळ यांनी दिलाय.  परंतु शुक्रवारी दिवाळीचा पाडवा हा महत्वाचा सण असून नंतर भाऊबीज आहे. शिवाय त्या दिवशी सुट्टी आहेच. सलग सुट्या असल्याने त्यातच मोठा सण असल्याने अनेक अधिकारी - कर्मचारी गावी वा नातेवाईकांकडे सहकुटुंब गेले आहेत. त्यातच सध्या एसटीचा संप पण आहे. त्यामुळे पालिकेने उपस्थित राहण्याची केलेली सक्ती अधिकारी व कर्मचा-यांना अडचणीची ठरली आहे. माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेनेच्या कामगार संघटनेचे अरुण कदम यांनी मात्र सणासुदीला कार्यक्रम घ्यायचा वरुन अधिकारी - कर्मचा-यांना सक्ती करणे निषेधार्ह असून नसती दांडगाई सहन केली जाणार नाही, असे सुनावले आहे.वास्तविक मीरारोड स्थानक पारसिराचे सुशोभिकरणाचे बहुतांशी काम झालेले असून प्रवाशी त्याचा वापर आधीपासूनच करत आहेत. त्यामुळे पुन्हा सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रम पालिकेने ठेवल्याने आता तेथे सुद्धा उपस्थिती लावावी लागणार आहे.

पाली जेट्टी हायमास्टने उजळलीमीरारोड - पाली जेट्टी येथील परीसर अखेर हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाला आहे. नगरसेवक असताना मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी पाली जेट्टीच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. जेट्टीचे दुस-या टप्प्याचे काम झाले असून किना-यावर काळोख असल्याने मच्छिमारांच्या सोयीसाठी डिमेलो यांनी हायमास्ट दिवे बसवण्याची मागणी केली होती.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस