शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांच्या शोधासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव, जिल्हा परिषदेच्या सीईओंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:45 IST

- सुरेश लोखंडे ठाणे - मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निवासी जागांसह भूखंडांना अतिशय ...

- सुरेश लोखंडेठाणे - मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निवासी जागांसह भूखंडांना अतिशय महत्त्व आले आहे. अशा या सोनेरी कालावधीत जिल्हा परिषदेची मालमत्ता विखुरली आहे. तिच्यावर काहींनी वर्षानुवर्षांपासून कब्जाही केला आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील मालमत्ता, भूखंड, दान केलेल्या वास्तूंची शोधाशोध सुरू आहे. याद्वारे करोडोंची संपत्ती शोधता येणार आहे.वर्षानुवर्षांपासूनच्या इमारती, दानपत्र असलेल्या जमिनी, शाळा, भूखंड अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेच्या नावावर दिसत नाहीत. काही ठिकाणी या मालमत्ता खाजगी व्यक्तींनी हडप केल्याचे दिसून येत आहेत. या सर्व संपत्तीचा शोध घेऊन त्या जिल्हा परिषदेच्या नावे करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी आता आदेश जारी केले आहेत. त्याद्वारे अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या संपत्तीचा शोध घेऊन त्या जिल्हा परिषदेच्या नावे आहे की नाही, याची खात्री करायची आहे. नसल्यास त्यांची मालकी त्वरित मिळवण्यासाठी कारवाईचे आदेश सोनवणे यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांसह पंचायत समित्यांचे विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, पशुवैद्यकीय अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे, बांधकाम आदी अधिकाऱ्यांना मालमत्ता शोधण्याची तंबी दिली आहे. काही ठिकाणी हडप केलेल्या मालमत्तेची मालकी त्वरित मिळवण्यासाठी कारवाईचे आदेश अधिकाºयांना जारी केले आहेत. यामध्ये जि.प., पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या जागा, इमारती, भूमिअभिलेखे, निवासी, अनिवासी जागा, इमारतींचा शोध घेण्याची सक्ती आहे. त्यांचा अहवालही त्वरित सुपूर्द करण्याचे सक्तीचे आदेश आहे.मालमत्ता वापराबाबत अहवाल मागितलाअधिकाºयांनी प्रथमत: त्यांच्या नियंत्रणातील विभागाच्या मालकीच्या मालमत्तेची नोंद घेणे अपेक्षित आहे. सीटी सर्व्हे, गट क्रमांकाची नोंद गरजेची आहे. मालमत्तेचे क्षेत्रफळ, जोते क्षेत्रफळ, जमीन मालमत्ता, इमारत ताब्यात घेतल्याचा कालावधी, विकत घेतल्याचा दिनांक, बांधकामाची तारीख अपेक्षित आहे.एवढेच नव्हे तर प्रॉपर्टीकार्डवरील नाव, सातबारावरील नोंदी, भाडेतत्त्वावर अथवा लीजवर दिलेली असल्याची नोंद, किती वर्षांसाठी दिली, त्याचे अ‍ॅग्रीमेंट उपलब्ध करावे लागणार आहे. एवढेच काय तर सध्याचा वापर कोणत्या कारणासाठी कोणाकडून होत आहे आदी अहवाल संबंधित अधिकाºयांनी त्वरित देण्याची सक्ती आहे.

टॅग्स :thaneठाणे