शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्याना मिळाले प्रशिक्षण

By सुरेश लोखंडे | Updated: April 6, 2024 19:29 IST

उर्वरीत मतदारसंघांमध्ये रविवारी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाणार आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभांसाठी २० रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याभरातील सहा हजार ५९२ मतदान केंद्रांवरील तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना आजपासून दोन दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षण दिले जात आहे. त्याप्रमाणे आजच्य पहिल्या दिवशी तब्बल सात विधानसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. उर्वरीत मतदारसंघांमध्ये रविवारी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाणार आहे.

जिल्ह्यातील या लाेकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या निवडणूक कामासाठी तैनात केलेल्या तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे देण्यास आजपासून प्रारंभ झालेला आहे. आजच्या पहिल्या दिवशी कल्याण पश्चिमेसह कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरील कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रमाणेच भिवंडी पूर्व, मीरा भाईंदरच्या कर्मचाऱ्यांना डाॅ. घाणेकर नाट्यगृहात आज प्रशिक्षण मिळाले. याशिवाय काेपरी पाचपाखाडी, ऐराेली आणि बेलापूर येथील मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस पूर्ण केलेला आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीच्या कामासाठी सर्व सरकारी, निमसरकारी, सहकार आदी विभागांसह पोलिस यंत्रणा मिळून जिल्ह्यातील या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ६५ हजारांवर मनुष्यबळ लागणार आहे. त्यापैकी मतदान केंद्रांवरील अधिकारी कर्मचाऱ्याना आजपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे प्रशिक्षण पार पडले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी कशी करायचे यासह या मतदान केंद्रावर करायची कार्यवाही, टपाली मतदानाबाबतची माहिती अर्जामध्ये भरून घेणे, मतदान केंद्रावरील करायच्या कार्यवाहीबाबत माहिती आजच्या पहिल्या प्रशिक्षणात देण्यात आली आहे. याशिवाय टेबलनिहाय हजेरीपट तयार करणे, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची माहिती देऊन माहिती पुस्तिका व निवडणूक संबंधी इतर नमुन्याचे वाटप या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे