भार्इंदर : पालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखपदी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी चार महिन्यांपूर्वी अभियंते किरण राठोड यांची बदली केली. मात्र ते अद्याप रुजू झालेले नाही. त्यामुळे पालिकेने काही दिवसांपासून सुरु केलेली कारवाई विभाग प्रमुखाविनाच सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.या मलईदार परंतु तितक्याच जबाबदारीचे पद असलेल्या विभागप्रमुखपदी नियुक्ती होण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची इच्छा असते. विभागप्रमुखपदी आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये दादासाहेब खेत्रे यांची नियुक्ती केली. खेत्रे यांच्याविरोधात अनेक तक्रारी येऊ लागल्यानंतर दोन दिवसातच आयुक्तांनी त्यांची उचलबांगडी करत त्यांना निलंबित केले. त्यानंतर या जागी पाणीपुरवठा विभागातील अभियंता राठोड यांची ८ फेब्रुवारीला नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या आदेशानंतर राठोड यांनी पदाचा कार्यभार अद्याप स्वीकारलेला नाही. शिवाय आयुक्तांनी त्यांच्यावर आदेश न मानल्याप्रकरणी कारवाई केली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आयुक्तांनी नुकत्याच काढलेल्या बदली आदेशाचे परिपत्रकही राठोड यांना लागू नसल्याची चर्चा पालिकेत सुरु झाली आहे. त्यातच आयुक्तांनी शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी सुरु केलेली कारवाई अतिक्रमण विभागप्रमुखशिवाय होत आहे. अधिकारी बैठकीत व्यस्तयाबाबत आयुक्तांशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय आस्थापना विभागाचे प्रमुख, उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचा निरोप देण्यात आला.
आदेश देऊनही अधिकारी रुजू नाही
By admin | Updated: June 16, 2016 01:10 IST