शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:33 IST

पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात बसस्टॉपसमोर भररस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. वशिष्ठ भालेराव (रा. मोहने) व राजेश दुबे (रा. आंबिवली) अशी या बेशिस्त रिक्षाचालकांची नावे आहेत.

कल्याण : पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात बसस्टॉपसमोर भररस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. वशिष्ठ भालेराव (रा. मोहने) व राजेश दुबे (रा. आंबिवली) अशी या बेशिस्त रिक्षाचालकांची नावे आहेत.कल्याण स्थानक परिसरात नेहमीच कशाही रिक्षा उभ्या करून प्रवासी घेतले जातात. त्यामुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होती. त्याचा सामना खाजगी वाहनचालक, एसटी-केडीएमटी बसचालक, नागरिक व प्रवासी यांना करावा लागतो. पश्चिमेला सरकत्या जिन्यालगत उल्हासनगरकडे जाणाºया रिक्षांसाठी स्टॅण्ड आहे. याव्यतिरिक्त मुख्य रस्त्यावर रिक्षाचालकांनी स्वत:हून एक बेकायदा स्टॅण्ड सुरू केले आहे. खडकपाडा, लालचौकी, दुर्गाडीकडे जाण्यासाठी असलेल्या रिक्षा स्टॅण्डपाठोपाठ अन्य एक स्टॅण्ड आहे. दीपक हॉटेलसमोरून बेकायदा रिक्षा प्रवासी भाडे भरले जाते. त्यामुळे तिथे वाहतूककोंडी होते. केडीएमटीच्या बसही तेथे उभ्या करता येत नाहीत. कल्याण एसटी बस डेपोच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षाचालकही तेथे रस्त्यात रिक्षा उभ्या करून भिवंडी, टाटानाका, चक्कीनाका येथे जाणारे प्रवासी भरतात. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्यास स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.रिक्षाचालक स्टेशन परिसरातून नेहमीच जवळचे भाडे नाकारतात. तसेच स्टेशन परिसरातून बेकायदा चौथी सीट घेतात. त्याचबरोबर कल्याणहून डोंबिवलीला जाणाºया प्रवाशांची ते अडवणूक करतात. चौथी सीट न मिळाल्यास उर्वरित तीन प्रवाशांना बहुतांश वेळा ताटकळत ठेवले जाते. विशेषत: भोईरवाडी व खंबाळपाड्याकडे जाणाºया प्रवाशांची रिक्षाचालक कोंडी करतात. चौथी सीट घेतल्याशिवाय प्रवासफेरी परवडत नाही, असे कारण रिक्षाचालक देतात. प्रत्यक्षात कल्याण ते डोंबिवली या सहा किलोमीटरसाठी प्रतिसीट शेअर भाडे २२ रुपये आहे. तीन प्रवासी घेतल्यास एका फेरीमागे ६६ रुपये रिक्षाचालकाला मिळतात. त्यात त्याचे एक लीटरही पेट्रोल खर्च होत नाही. एका लीटरमध्ये त्यांच्या दोन फेºया होतात. मात्र, डोंबिवली ते कल्याण प्रवासासाठी प्रतिसीटसाठी २५ रुपये भाडे आकारले जाते. जाताना २२ व येताना २५ रुपये हा हिशेब कोणी ठरवून दिला. त्यावर, आरटीओचे नियंत्रण का नाही? आरटीओ व वाहतूक पोलिसांनी याचीही झाडाझडती घ्यावी, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत.डोंबिवलीत सात रिक्षा जप्तडोंबिवली : शहरातील बेकायदा रिक्षांविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची मोहीम सुरूच आहे. गुरुवारी ६१९ हून अधिक रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्या कल्याणमधील आरटीओ कार्यालयात नेण्यात आल्या. तर, नोटीस बजावलेल्या ३४ रिक्षांच्या चालकमालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.पूर्वेतील रामनगर भागात केळकर रोड, एस.व्ही. रोड आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. रिक्षा युनियननेही बेकायदा रिक्षांवर कारवाईची मागणी केली आहे. परिणामी, त्याचा फटका कारवाईला बसला नाही. नागरिकांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.बेकायदा रिक्षांबरोबरच बेकायदा प्रवासी वाहतुकीलाही आळा बसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांनीही चौथ्या सीटवरील जीवघेणा प्रवास टाळावा, अशी जागृती काही दिवसांपूर्वीच प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाले मंचने केली आहे.