शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या ८५० वाहनांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:04 IST

५९ लाखांचा दंड वसूल; दोन महिन्यांतील कारवाई

- पंकज रोडेकर ठाणे : राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करून राजरोस वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) नियमित कारवाई सुरूच असते. तरीसुद्धा हे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. यानुसार, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या सुमारे ८५० वाहनांविरोधात मागील दोन दिवसांत एफआयआर दाखल केले. त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यांत ४६४ दोषी वाहनांद्वारे ५९ लाख ५० हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एफआयआर दाखल होण्याची बहुधा राज्यातील पहिलीच कारवाई असावी, असेही म्हटले जात आहे.क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने गायकवाड यांनी तपासणी केलेल्या काही जुन्या आणि नव्या अशा ८४८ गाड्यांवर २ आणि ५ आॅगस्ट रोजी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल केले. यामध्ये २ आॅगस्टला ६९४, तर ५ आॅगस्ट रोजी १५४ असे ८४८ एफआयआर दाखल केले आहेत. ते ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांत तपासणीतील दोषी वाहनांवर केले आहेत. तसेच भिवंडीत आणखी १५० ते २०० एफआयआर दाखल करण्यासाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यांत केलेल्या तपासणीत ४६४ वाहने दोषी आढळून आली असून त्यांच्याकडून ५९ लाख ५० हजार ६०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती आरटीओने दिली.किती मालवाहतूक करता येते?मालवाहतूक करणाºया सहाचाकी वाहनांना ९ ते १० टन तसेच १० चाकी वाहनांना जवळपास १५ ते १६ टन वाहतूक करण्याची परवानगी आहे.असा आकारला जातो दंडमोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार, कारवाई केली जाते. पहिल्या टनाला अडीच हजार रुपये असून त्यापुढील टनाला प्रति हजार रुपये दंडाची रक्कम वाढण्यात येते.रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८४८ एफआयआर दाखल केले आहेत. तसेच २०० वाहनांवर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून तेही लवकरच दाखल होतील. त्याचबरोबर ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार आहे.-रवी गायकवाड, आरटीओ अधिकारी, ठाणे

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस