शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मातृसुरक्षा दिनानिमित्त जिल्ह्यात आरोग्य पंधरवडा

By admin | Updated: July 11, 2015 03:35 IST

गर्भवतीचे आरोग्य उत्तम राहिल्यास जन्माला येणारी नवीन पिढी सुदृढ, निरोगी व कुपोषणविरहित राहण्यास मदत होईल. यासाठी राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनाचे औचित्य

ठाणे : गर्भवतीचे आरोग्य उत्तम राहिल्यास जन्माला येणारी नवीन पिढी सुदृढ, निरोगी व कुपोषणविरहित राहण्यास मदत होईल. यासाठी राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषद व सिव्हील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यात शुक्रवारपासून (१० जुलै) आरोग्य पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य पंधरवडा हाती घेण्यात आला आहे. यात रुग्ण मेळावे, महिला बचत गट मेळावे, अंगणवाडी केंद्रांतील कुपोषित बालकांची १०० टक्के तपासणी, दूषित पाण्याचे नमुने आढळलेल्या सुमारे ८२३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यातील क्लोरिनची कसून तपासणी, १० ते ५० वयोगटांतील सुमारे ५५ हजार ८६६ स्त्री-पुरुषांच्या हिमोग्लोबिनची तपासणी होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम मुरबाड येथून सुरू करण्यात आला आहे. या वेळी १२ हजार ४११ जणांची तपासणी झाली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.एम. पाटील, डॉ. बी.एस. सोनावणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)