शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:43 IST

जागा नसल्याचा पालिकेचा कांगावा; स्मार्ट सिटीचा गवगवा फसवा, पाच लाख लोकसंख्येची हेळसांड

- अजित मांडके ठाणे : एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिका मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करत आहे. परंतु, दुसरीकडे पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात असूनही तेथे एकही आरोग्य केंद्र नसल्याची बाब दिव्यात आलेल्या पुरानंतर प्रकर्षाने समोर आली आहे. दिव्यात अनधिकृत इमले उभे राहत आहेत, त्यांना इतर सोयीसुविधा दिल्या जात आहेत. येथील अनेक आरक्षणात फेरबदल केले जात आहेत. परंतु, असे असताना आरोग्य केंद्रासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या दिव्याखाली अंधार अशीच काहीशी गत झाली आहे.शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्रीपर्यंत आपला जोर कायम ठेवला होता. सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरीदेखील दिवा या भागात साचलेले पाणी मात्र काही ओसरलेले नाही. सोमवारी सायंकाळपासून ते ओसरण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी आता पालिकेची कोणतीही आरोग्याची सोय नसल्याने या भागातील रहिवाशांसमोर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दिव्याच्या विकासासाठी उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, टीएमटी डेपो आदींसह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिवाय, काही महत्त्वाच्या सुविधांसाठी या भागातील काही आरक्षणांमध्ये बदल करण्याचे प्रस्तावही मागील काही महासभांमध्ये मंजूर झाले आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचा जयघोष पालिकेकडून केला जात आहे. असे असताना पाच लाख लोकसंख्येला आरोग्य केंद्र नाही. ही स्मार्ट सिटीच्या दिशेने चालणाऱ्या ठाणे शहरासाठी अतिशय चिंतेची व खेदाची गोष्ट आहे. या भागात आरोग्य केंद्र सुरू व्हावे, यासाठी काही दक्ष नागरिकांनी तसेच काही राजकीय मंडळींनी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही पालिकेला जाग आली नसल्याचेच दिसत आहे. आता पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर येथील सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनाही या भागात आरोग्य केंद्र नसल्याचे शहाणपण आले आहे. त्यामुळेच आता काहींनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.दुसरीकडे या भागात आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. या भागात अनधिकृत इमारती बांधण्यासाठी आणि त्याठिकाणी आपली खळगी भरून राजकीय पोळी भाजण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. मात्र, आरोग्य केंद्रासाठी जागा नाही, हे पालिकेचे म्हणणे थोडे अजबच ठरणारे आहे.सध्या या भागातील रहिवाशांना खाजगी डॉक्टर किंवा अगदीच पालिकेचे आरोग्य केंद्र गाठायचे झाले, तर तीन ते चार किमीचे अंतर कापून खिशाला कात्री देऊन शीळ भागात जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेला आता तरी जाग येईल का, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.यासंदर्भात उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात पालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्यापही पालिकेला जाग आलेली नाही.आगासन येथे पोलीस स्टेशन, प्रभाग समिती कार्यालय आणि आरोग्य केंद्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यानुसार, येत्या काळात ते काम सुरू होण्याची अपेक्षा त्यांनी त्यांनी व्यक्त केली.दिवा गावात आरोग्य केंद्र नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते सुरू करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, त्याची माहिती घेऊन पुढे काय कार्यवाही करायची, ते निश्चित केले जाईल.- डॉ. हरदास गुजर, आरोग्य अधिकारी, ठामपा

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य