शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 19, 2016 02:04 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात ४५ टक्के कपात केली. पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के गळती होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रत्येक प्रभागात बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे. एका महिन्यात पालिकेने २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून एप्रिल महिनाअखेर ३५० बोअरवेल खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शहरात ६३० जुन्या बोअरवेलपैकी ४०० सुस्थितीत आहेत. त्यापैकी २६० बोअरवेल सुरू असून १०० कायमच्या बंद झाल्या आहेत. तर, ४५ बोअरवेलची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, अशी आशा नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी) नदीकिनारी बोअरवेलची मागणी बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत तज्ज्ञांचे असून स्वत:चा पाणीस्रोत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. तसेच सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील एमआयडीसीचे पंप ताब्यात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा उभी करण्याचा मानस अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवला.