शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी आक्रोश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:43 IST

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजाच्या सर्व राजकीय पक्षांच्या जेष्ठ, कनिष्ठ कार्यकर्त्यांचं एकत्रित आंदोलन

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. आरक्षणावरील ही स्थगिती उठवण्यासाठी ओबीसी समाजाची आकडेवारी केंद्र सरकारने न्यायालयात सादर करावी आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण एक-दोन महिन्यात पूर्ववत करावे आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी आक्रोश तथा ठिय्या आंदोलन ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी  छेडले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजाच्या सर्व राजकीय पक्षांच्या जेष्ठ, कनिष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन छेडले आहे.

जिल्ह्यात लागू असलेला मनाई आदेश आणि कोरोनाच्या पाश्वभूमिवर पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले आणि त्यांनी नियोजनाप्रमाणे येथील शासकीय विश्रामगृहासमोर ठरलेल्या वेळी आंदोलन छेडले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले,असे या आंदोलनातील ओबीसी समाजाचे नेते व काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पाटीलखेडे यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडे ओबीसी समाजाची सांख्येकी माहिती न्यायालयाने मागितली,प ण ती वेळेत न दिल्यामुळे ‌न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली, असा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी करुन विविध मागण्या यावेळी केल्या. न्यायालयाने मागितली माहिती केंद्रांने दिली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय अ स्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करीत ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून ही यावेळी आंदोलन छेडण्यात आले. केंद शासनाने ओबीसी समाजाचा हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करुन ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या कार्यकत्यांनी शुक्रवारी आक्रोश तथा ठिय्या आंदोलन छेडले.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी मनाई आदेश जारी केलेले असताना आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन  होण्याच्या दृष्टीने ठाणेनगर पोलिसांनी या ठिय्या आंदोलनास परवानगी नाकारल्याची चर्चा होती. मात्र वरिष्ठ कार्यकर्त्यांनी नियोजन स्थळी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन छेडले. अखिल भारतीय समता परिषदेच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात विलास गायकर, दिलीप बारटक्के, राज राजापूरकर, गजानन चौधरी, नितिन पाटील, श्रीकांत गाडेकर, सुभाष देवरे, सचिन शिंदे, मंजुला ढाकी, राजनाथ यादव, मिलिंद बनकर आदी जेष्ठ, कनिष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाटीलखेडे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :reservationआरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण