शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नौपाड्यात होणार पार्किंग प्लाझा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:08 IST

स्टेशन आणि नौपाडा परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत.

ठाणे : स्टेशन आणि नौपाडा परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता ठाणे महापालिकेने नौपाडा प्रभाग समिती कार्यालय इतरत्र पर्यायी ठिकाणी हलवून शाहु मार्केटची शाहू मार्केटची इमारत जमिनदोस्त करून त्याजागी सार्वजनिक पार्किंग प्लाझा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी तब्बल २०० कारसह असंख्य दुचाकींच्या पार्किंगची सोय होणार आहे. तसेच येथील गाळेधारकांचे तळ मजल्यावर पुनर्वसन करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.शाहू मार्केटची इमारत १९८० च्या दरम्यान बांधली असून ती सध्या जीर्ण झाली आहे. या इमारतीत नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, पुनर्वसन केलेले काही गाळेधारक (पोळी भाजी विक्रेते) व ग्राहक पंचायतीचे गोडावून आहे. या इमारतीची पुढील बाजू उंचावर तर मागील बाजू खाली गेलेली आहे. त्यामुळे मागील बाजू तोडण्यात येणार असून तळ मजल्यावर येथील गाळेधाराकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक पार्किंग उभारल्यास त्यापासून ५०० मी. त्रिज्येच्या परिसरात हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, एम.जी. रोड, तिनहातनाका, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण कॉलनी आदी परिसर येतो. तसेच एक किमीच्या त्रिज्येत ठाणे स्टेशन परिसर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारल्यास त्याचा जुन्या ठाण्यातील बहुतांश भागांना लाभ होऊन स्टेशन परिसरातील रस्ते पार्किंग मुक्त होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वासही पालिकेला वाटत आहे. या ठिकाणाहून स्टेशनकडे जाण्यासाठी टीएमटीच्या मिनी बस ठेवल्यास स्टेशन परिसरातील पार्किंगही कमी होण्यास मदत होणार आहे.शाहू मार्केट इमारतीमधील प्रभाग समिती कार्यालय विष्णु नगरभागातील शाळा क्रमांक १९ चे इमारतीमध्ये हलविण्याचा पालिकेचा विचार आहे. ही इमारत सध्या बहुसंख्य प्रमाणात रिकामी आहे. तळ अधिक चार मजल्यांची ती असून तिला दोन जिने आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावर हॉल व कार्यालय असून, प्रत्येक मजल्यावर ८ वर्ग केले आहेत. यापैकी तळ मजला अधिक पहिला मजला प्रभाग कार्यालयास ठेवल्यास ८०० चौरस मीटर क्षेत्र प्रभाग कार्यालयाला उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास शिल्लक ५०० चौरस मीटर क्षेत्रातही बांधकाम करता येऊ शकणार आहे.दरम्यान, शाहू मार्केटमध्ये सार्वजनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथे बेसमेंटमध्ये दुचाकींची व्यवस्था केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंग