शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात फराळ पाठवणाऱ्यांची संख्या घटली; कोरोना विषाणूचा धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 00:19 IST

दरवर्षी कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो.

- कुलदीप घायवटकल्याण : सातासमुद्रापार राहणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाइकांना आणि कुटुंबातील व्यक्तीला दिवाळीचा फराळ, भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हे साहित्य पोहोचवण्याचे काम कुरिअर कंपनी, टपाल विभाग करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्सलची सेवा सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या पार्सल सेवेत कमालीची घट झाली आहे.

दरवर्षी कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात शिकत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी कल्याण-डोंबिवलीकर फराळ, भेटवस्तू पाठवत असतात. यंदा कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी परदेशात पार्सल पाठविले नाही. परदेशात पार्सल पाठविण्याच्या सेवेत टपाल विभागाकडून कोणतीही भाडेवाढ झाली नाही. पण, अनेक कुरिअर कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे पार्सलच्या सेवेत घट झालेली आहे.

टपाल विभागातर्फे ८२ देशांमध्ये फराळ, दिवाळी साहित्य आणि भेटवस्तू पाठविल्या जात आहेत. अमेरिका, कॅनडा, युरोपातील जर्मनी, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड तसेच आशिया खंडातील श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशांमध्येही वस्तू पाठविण्यात येतात. मात्र, कल्याण-डोंबिवलीतून अमेरिका आणि यूके या देशात सर्वाधिक फराळ आणि भेटवस्तू पाठविल्या जातात.

टपाल विभागातर्फे एक किलो वजनाप्रमाणे दर आकारून वस्तू किंवा फराळ परदेशात पाठवले जातात.  कोरोना काळातही ही सेवा अविरत सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्याप्रमाणे इतर सेवा महागल्या, त्याप्रमाणे या काळात कोणत्याही प्रकारचे जादा दर आकारले नसल्याचे टपाल विभागाने सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे