शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय; पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 23:21 IST

पोलीस पाल्यांचा आपल्या वडिलांना भावनिक सल्ला : वर्षभरात ३५ जणांना गमवावा लागला जीव

जितेंद्र कालेकरठाणे : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही अधिक कडक केला आहे. या काळात पोलिसांवरही अधिक ताण वाढला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना हटविताना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तब्बल दोन हजार २६६ पोलीस बाधित झाले, तर ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळेच बाबा बंदोबस्तावर जरूर जा... पण तुमच्याही आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला ठाण्यातील पोलीस पाल्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी २२ मार्च २०२० पासून ठाणे शहर आणि जिल्हाभर संचारबंदी होती. त्यासाठी राज्य राखीव दलासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. रस्त्यावर विनाकारण फिरणारे, नियम तोडणारे वाहनचालक तसेच मार्केटमध्येही गर्दी करणाऱ्यांना बंदोबस्तावरील पोलिसांना कधी चढा आवाज करीत तर कधी काठीचा धाक दाखवावा लागत होता. त्याचवेळी काही परप्रांतीय मजुरांना कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते.

अशावेळी एक लाखाहून अधिक मजुरांना याच ठाणे पोलिसांनी एसटी आणि रेल्वेच्या मदतीने घरी परतण्यासाठी मोलाची मदत केली होती. आता दुसऱ्या लाटेच्या वेळीही पोलिसांकडून चोख बंदोबस्त राबविला जात आहे. कोरोना योद्धा म्हणून तुम्ही जरुर कर्तव्य पार पाडा; पण त्याचबरोबर तुमची स्वत:चीही काळजी घ्या. आम्ही तुमची वाट पहात आहोत, लवकर घरी या, अशी पोलिसांची मुले त्यांना भावनिक आवाहन करतात. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस