शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य शून्य कचरा मोहिमेचे!

By admin | Updated: January 23, 2017 05:21 IST

केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना यावर उपाय म्हणून प्रत्येक प्रभागात शून्य कचरा मोहीम राबवण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याची माहिती स्थायी सभापती रमेश म्हात्रे यांनी दिली. येत्या अंदाजपत्रकात विशेष आर्थिक निधीची तरतूद करणार असून स्वच्छतेची हमी देणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रभागांना तेथील सोसायट्यांना तसेच सामाजिक संस्थांना गौरवण्यात येऊन तेथील विकासासाठी राखीव निधी दिला जाईल, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.रविवारी कोपर रोड प्रभागात गावदेवी मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. अशी मोहीम एक दिवस राबवून कचऱ्याची समस्या सुटणारी नाही. त्यासाठी सर्वच प्रभागांत विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे म्हात्रे म्हणाले. वेंगुर्ला नगरपालिका स्वच्छतेबाबत राज्यात पहिला क्रमांक पटकावते. कागल नगरपालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीसारखा प्रकल्प उभा करते, अशी उदाहरणे समोर असताना आपल्याकडे गोळा होणाऱ्या ६५० टन कचऱ्यातूनही खत, वीजनिर्मितीसारखे प्रकल्प उभे राहू शकतात, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. कचरा आपल्या दारात नको, अशी प्रत्येकाची धारणा असते. डम्पिंगला विरोध होत असताना कचऱ्यावर उपाय म्हणून उभारणाऱ्या बायोगॅस प्रकल्पालाही ठिकठिकाणी हरकत घेत आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम नगरसेवकांनी करायला हवे. (प्रतिनिधी)