बदलापूर : अंबरनाथ तालुक्यातील सर्व सातबारा उतारे आॅनलाइन केले असले, तरी अनेक शेतकऱ्यांना आॅनलाइन सातबारा उतारे काढता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांची ही समस्या दूर झाली असून १ मे पासून अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात मशीनमध्ये २० रुपये जमा केल्यास लागलीच सातबारा उतारा मिळणार आहे. मशीनच्या स्क्रीनवरील बटण दाबल्यावर लागलीच शेतकऱ्याला त्याच्या जागेचा सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. एटीएम यंत्राप्रमाणे हे यंत्र असून त्यावर सर्व्हे नंबर टाकल्यावर लागलीच त्याची प्रिंट उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)
आता व्हेंडींगमशीनमधून सातबारा
By admin | Updated: April 25, 2017 23:58 IST