शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता जागा मालकांवरही ‘एमआरटीपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:28 IST

बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम : केडीएमसीची कारवाई सुरूच राहणार

- प्रशांत माने 

कल्याण : केडीएमसीने २७ गावांमधील बेकायदा बांधकामांविरोधात नुकतीच विशेष मोहीम राबवली. पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या देखरेखीखाली झालेल्या या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई सुरूच राहणार असून बेकायदा बांधकामे उभी असलेल्या जमिनीच्या मालकांवरही महाराष्टÑ प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमांतर्गत (एमआरटीपी) कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

केडीएमसीच्या हद्दीतील बेकायदा बांधकामे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. महासभेत तहकुबी आणि लक्षवेधींद्वारे वारंवार लक्ष वेधले गेले आहे. पण, प्रभावी कारवाई होत नव्हती. आता बोडके यांनी पदभार स्वीकारल्यापासून पदपथावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम उघडली आहे. जोशींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागस्तरावर ही कारवाई सुरू आहे. ‘क’ आणि ‘ब’ प्रभागांत पदपथावरील अतिक्रमण हटवल्यानंतर २७ गावांतील बेकायदा बांधकामांविरोधात सध्या कारवाई सुरू आहे. गुरुवारी आडिवली-ढोकळी ते पिसवलीदरम्यान झालेल्या कारवाईवेळी जोशी यांच्यासोबत दस्तुरखुद्द बोडके घटनास्थळी होते.

‘क’ प्रभागात पदपथावरील अतिक्रमणांसंदर्भात झालेल्या कारवाईवेळीही आयुक्त स्वत: उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे २७ गावांमध्ये कारवाईदरम्यान बोडके आणि जोशी यांनी केलेल्या दौऱ्याच्या वेळी आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणावर ‘ब’ प्रभागात बांधकामे उभी राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तब्बल ४० बांधकामे अशा प्रकारे आढळून आली. त्यासह अन्य बांधकामांनाही नोटिसा बजावल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. दिवाळी सुटीच्या कालावधीत उभ्या राहिलेल्या बांधकामांचीही माहिती मागवली आहे. ही संख्या कमी असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.‘ह’ प्रभागातही विशेष मोहीम‘ई’, ‘आय’, ‘अ’ आणि ‘ह’ प्रभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. स्थानिक प्रभागक्षेत्र अधिकाºयांचा याकडे कानाडोळा होत असताना बेकायदा बांधकाम नियंत्रक विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे. २७ गावांपाठोपाठ हा विभाग मोर्चा डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागाकडे वळवणार असल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून २७ गावांप्रमाणे या ठिकाणीही प्रभावी कारवाई होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका