शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

तूरडाळ १४० वर आता हरबऱ्याच्याच डाळीचे वरण करा

By admin | Updated: August 18, 2015 23:08 IST

महाराष्ट्रात सांबार तसेच वरण बनविण्यासाठी स्वयंपाकात रोजच लागणारी तुरीची डाळ गेल्या दोन महिन्यात ३० ते ५० टक्क्यांनी महाग होऊन १४० रुपये किलोवर गेली आहे

ठाणे : महाराष्ट्रात सांबार तसेच वरण बनविण्यासाठी स्वयंपाकात रोजच लागणारी तुरीची डाळ गेल्या दोन महिन्यात ३० ते ५० टक्क्यांनी महाग होऊन १४० रुपये किलोवर गेली आहे. साठेबाजी आणि गारपीटसारख्या नैसर्गिक संकटांमुळे घटलेली आवक यामुळे तुरडाळ कडाडल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात १०० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ आता १२० रुपये किलोने बाजारात विक्रीस उपलब्ध आहे . उत्तम प्रकारची तूरडाळ१४० रुपये किलोने विकली जात आहे. इतकेच नव्हे तर तूर डाळीनंतर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापर होत असणारी मूग डाळही ८० रुपयावरून १००-११० रुपयांपर्यंत वधारली आहे. डाळी खरेदी करतानाही व्यापाऱ्यांची कसरत होत आहे. आॅरगॅनिक तूरडाळ ही पांढऱ्या रंगाची असते. ती आणखीनच महाग आहे. तेलात पॉलीश केलेली तूरडाळ व मशीनवर पॉलीश केलेली तूरडाळही बाजारात उपलब्ध आहे. त्यांचेही दर कडाडले आहेत. त्यांचीही हीच स्थिती आहे. डाळींमध्ये पूरण आणि वरण या दोन्हीसाठी तूरीच्या डाळीला पसंती दिली जाते. ती तिच्या गुळचट चवीमुळे. त्या खालोखाल मूग, हरभरा उडीद, मठ, मसूर या डाळींना मागणी असते. परंतु आता तूरीची डाळ महागल्यामुळे त्यातल्या त्यात स्वस्त असणाऱ्या हरभऱ्याच्या डाळीचा वापर करण्यावाचून आता जनतेला पर्याय उरलेला नाही. अ‍ॅसिडीटी आणि गॅस तसेच मधुमेह याच्या रुग्णांसाठी मूगाची डाळ उपयुक्त मानली जाते. परंतु तिचेही भाव कडाडल्यामुळे आता करावे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.