शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आता गुजराती नामफलकाचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 05:19 IST

राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे

भार्इंदर : येथील प्रभाग क्रमांक-६ मधील नारायणनगर परिसरात पालिकेने गुजराती भाषेत चौकाचा नामफलक लावल्याने नवा वाद उफाळून आला आहे. हा नामफलक मराठीतच लावण्यात यावा, यासाठी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बामणे यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या गुजराती भाषेतील वीजबिलांवरून भार्इंदर येथे अलीकडेच मोठे वादंग झाले होते.

राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. परंतु, जो तो मराठी भाषेची गळचेपी करत असून परप्रांतीय भाषेचाच उदोउदो केला जात आहे. शहरात परप्रांतीयांचा सुळसुळाट वाढला असला, तरी मातृभाषेचा आदर करणे त्यांचे कर्तव्य आहे. याउलट, परप्रांतीय भाषेला शहरात ठिकठिकाणी जाणीवपूर्वक प्राधान्य दिले जात असून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार केला जात आहे. याकडे स्थानिक पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष होऊन ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालील कारभारात व्यस्त झाल्याचा आरोप बामणे यांनी केला आहे. नजीकच्या काळात शहरात परप्रांतीय भाषेचा वाद उफाळून येत असताना पालिका व पोलीस त्याची दक्षता घेत नाहीत. त्याला राजकारणीच खतपाणी घालत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. अशाच राजकीय प्रेरणेने पालिकेने नारायणनगर परिसरात चक्क गुजराती भाषेत नामफलक लावला आहे. यापूर्वीसुद्धा पालिकेने दीडशे फूट मार्गावरील वंदन चौकात गुजराती भाषेमध्ये नामफलक बसवला होता. त्याला विरोध झाल्यानंतर गुजराती नामफलक काढून मराठी नामफलक लावण्यात आला. अलीकडेच अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने गुजराती भाषेतील वीजबिल वितरित केल्याने राजकीय गदारोळ झाला. मराठी भाषेच्या वापरासाठी चळवळ सुरू करणाºया मराठी एकीकरण समितीने सर्वप्रथम त्याविरोधात आवाज उठवला होता. आता मराठी भाषेच्या या गळचेपीत आणखी एक भर पडली आहे. भार्इंदर पश्चिमेकडील नारायणनगर येथे पालिकेने गुजराती नामफलक लावल्याचे समजताच युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बामणे यांनी नामफलक हटवण्याची मागणी आयुक्तांकडे केली.मराठी भाषेच्या वापरात हयगय करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही अशा प्रकारे मराठी भाषेची गळचेपी स्थानिक प्रशासनाकडूनच सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मराठी भाषेचा अपमान केला आहे. गुजराती नामफलक त्वरित न हटवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेGujaratगुजरात