शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता प्रभागातच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा ठामपाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 02:39 IST

शहरात निर्माण होणा-या कच-याची त्याच परिसरात विकेंद्रित व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्यनगर व सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंपोस्टिंग पीट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहा प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी ५०० किलो क्षमतेचे हे पीट उभारले जाणार आहे.

ठाणे : शहरात निर्माण होणा-या कच-याची त्याच परिसरात विकेंद्रित व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्यनगर व सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंपोस्टिंग पीट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहा प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी ५०० किलो क्षमतेचे हे पीट उभारले जाणार आहे.महापालिका हद्दीत आजघडीला ८०० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होत आहे. तो दिवा येथील डम्पिंगवर टाकला जात आहे. तसेच महापालिकेने मागील वर्षभरात कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील काही कार्यान्वित झाले असून काहींवर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय, प्रत्येक सोसायटीने आपला कचरा मार्गी लावावा, यासाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत. यापुढे जाऊन प्रत्येक प्रभाग समितीमधील निर्माण होणाºया कचºयाची त्याच ठिकाणी शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.त्यासाठी वागळे आणि लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीअंतर्गत यानुसार ५०० किलो क्षमतेचे १० पीट व एक टन क्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ कंपोस्टिंग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रियादेखील अंतिम आली आहे. याकामी एकूण २३ लाख ६९ हजार ४८६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याच पद्धतीचे पीट्स कळवा, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गतदेखील उभारले जाणार असून त्यानुसार ५०० किलो क्षमतेचे नऊ पीट व एक टन क्षमतेचे १० पीट असे १९ पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी १७ लाख नऊ हजार ६४२ रुपयांचा खर्च आहे.प्रस्ताव महासभेपुढेनौपाडा, उथळसर प्रभाग समितीमध्ये ५०० किलो क्षमतेचे १० पीट व एक टन क्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ कंपोस्टिंग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी २३ लाख दोन हजार ३१० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे तीन प्रस्ताव येत्या २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका