शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे शिळी मिठाई विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:44 IST

यापुढे मिठाई सेवनास योग्य असल्याचा कालावधी न टाकताच तिची विक्री करणाºया हलवायांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ताजेपणाची तारीख देणे बंधनकारकहलवायाकडून मिळणार ‘फ्रेश’ मिठाई!उत्पादन तारीख असण्याच्याही सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मिठाई ‘फ्रेश’ आहे का? असा प्रश्न कोणत्याही हलवायाला ग्राहकांकडून हमखास विचारला जातो. यापुढे असा प्रश्न विचारण्याची गरज राहणार नाही. कारण ही मिठाई किती तारखेपर्यंत सेवन करता येईल, याची तारीखच टाकणे आता अन्न व औषध प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. तसे आढळले नाही तर संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे ठाण्याचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला आहे.अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, सुटटया पद्धतीने मिठाईची विक्री करणाºया व्यावसायिकांना मिठाईच्या उत्पादनाची तारीख उल्लेख करणे हे ऐच्छिक राहणार आहे. परंतू, मिठाई खाण्यासाठीचा योग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट) तारखेचा उल्लेख करणे मात्र बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज १ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मिष्टान्न विक्री करणाºया किंवा हलवाईच्या दुकानांमध्ये यापुढे पेढे, लाडू किंवा कोणताही तत्सम पदार्थ विक्रीसाठी ठेवलेल्या ट्रेवर, शोकेसवर तो कधीपर्यंत सेवन करता येईल, त्या तारखेचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक राहणार आहे. अनेक सण उत्सवांमध्ये मिठाई विक्रीच्या दुकानांबाहेर ती खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र असते. परंतू, सुट्ट्या पद्धतीने विक्र ी होणारी मिठाई कधी बनवली आणि ती कधीपर्यंत खाता येऊ शकते, याबाबतच्या तारखेचा कोणताही उल्लेख केलेला नसतो. त्यामुळेच अनेकदा शिळया मिठाईच्या विक्रीतून विषबाधेसारखे प्रकारही होऊन जीव धोक्यात सापडू शकतो. त्यामुळेच आता केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ती खाण्यासाठीचा योग्य कालावधी ठरवून तसे उल्लेख करणे बंधनकारक राहणार आहे. तसा उल्लेख न करणाºया मिठाई विक्रेत्यांची तपासणी करुन त्यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. 

‘‘ एखाद्या मिठाई विक्रेत्याने त्याच्या मिठाईच्या उत्पादनाची तारीख टाकणे हे ऐच्छिक राहणार आहे. पण ते कधीपर्यंत सेवन करावे, याची तारीख प्रदर्शित करणे हे मात्र यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी अशा तारखांचा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’’शिवाजी देसाई, सह आयुक्त, कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन,ठाणे

टॅग्स :thaneठाणेShoppingखरेदीMaharashtraमहाराष्ट्र