शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रेल्वेच्या विजेच्या लाईन खालील बांधकामांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: October 14, 2022 15:56 IST

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या समांतर गेलेली रेल्वेची उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली अवैध बांधकामे झाल्याने, अपघाताची शक्यता निर्माण झाली. रेल्वे याबाबत महापालिकेला पत्र दिल्यावर अशा बांधकामाना अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी नोटिसा देऊन बांधकामे काढून घेण्यास बजावले आहे.

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले. त्यापैकी २०० बांधकामे पूर्णतः बाधित झाले असून त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे. तर अंशतः बाधित झालेल्या दुकानदारांनी बहुमजली बांधकामे केली. रस्त्याच्या समांतर रेल्वेची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून रुंदीकरणाच्या नावाखाली विधुत वाहिनी गेली, त्याखाली उंच बांधकामे केली. या बांधकामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त करून बांधकामाबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला कारवाईचे पत्र पाठविले. महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशनुसार नोटसा देऊन बांधकामे स्वतःहून काढण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या नोटीसीने दुकानदारांत खळबळ उडाली आहे. 

रस्ता रुंदीकरणात दुकानाची जागा गेली असून पुन्हा महापालिकेने नोटिसा पाठविल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. बांधकामे व विद्युत वाहिनी यामध्ये अंतर असून अपघात होण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आतापर्यंत १० दुकानदारांना बांधकामे स्वतःहून काढण्याच्या नोटिसा दिल्या असून रेल्वे विद्युत वाहिनी खालील सर्वच दुकानदारांना नोटिसा देणार असल्याचे संकेत दिले. रुंदीकरणात ज्यांचे दुकाने बाधित झाली. त्यांनी बहुमजली बांधकामे कोणतीही बांधकाम परवाने न घेता बांधण्यात आले. या बांधकामाला अवैध असल्याचे ठरवून दुप्पट मालमत्ता कर बिले देण्यात आले असे दुकानदारांचे म्हणणे आहे. नोटिसा दिलेल्या दुकानदारांनी स्वतःहून बांधकामे काढली नाहीतर, त्यावर पाडकाम कारवाईचा इशारा शिंपी यांनी दिला आहे. 

शांतीप्रकाश शाळा रस्ता रुंदीकरणाची बांधकामाची चर्चा कॅम्प नं-५ वसंतबहार शांतीप्रकाश शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बहुमजली विना बांधकामे उभी राहिली असून महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर