शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

126 आस्थापनांना नोटिसा, 344 जणांवर कारवाई; कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:55 IST

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन : यंत्रणेने उगारला बडगा, मोहीम केली तीव्र, लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव

ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच १२६ मंगल कार्यालये, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांनाही नोटिसा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांना सतर्कतेच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विशेषत: मास्क परिधान न करणाऱ्या ३४४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १२६ मंगल कार्यालये, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत.

तसेच नियम डावलून घेतल्या जाणाऱ्या बैठकांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, आतापर्यंत पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांत विशेष पथके स्थापन करून कारवाई सुरू केली आहे. तसेच दुकान, हॉटेल आणि इतर आस्थापनांमधील कामगारांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे