शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण; शिवसेना ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 05:57 IST

सोशल मिडियावर चित्रफित व्हायरल: आरोप प्रत्यारोपांचे ढोल ताशे

जितेंद्र कालेकर

ठाणे - शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आनंद (मठ) आश्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण केल्याची एक चित्रफित समाजमाध्यमांवर शुक्रवारी व्हायरल झाली. याच चित्रफितीवरुन कै. दिघे यांचे पुतणे आणि उद्धव गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर समाजमाध्यमांद्वारे टीका केली आहे. तर शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पैसे उधळणाऱ्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. मात्र ज्यांना ओवाळून टाकले आहे, त्यांनी आम्हाला दिघे साहेब काय आहेत ते शिकवू नये, अशी प्रतिक्रीया प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.

दिघे यांच्या तसबीरीवरून पैसे ओवाळून त्या पैशांची उधळण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर या प्रकारावर उद्धव गटाचे केदार यांनी दिघे यांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. त्यामुळे आमचा आनंद हरपला, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली . गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक दरवर्षी यंदाही गुरुवारी आनंद आश्रमासमोर जाताना, ढोल ताशा पथकासह लहान मुले आश्रमात गेली. त्याठिकाणी ढोल ताशा पथकाच्या ठेक्यावर ही मुले नाचत होती. मात्र यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर दिघे यांच्या फोटोवरून पैसे ओवाळून ते उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे काही कार्यकर्ते दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिवसैनिकांकडून सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गुरुवर्य आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या विचाराला कधी समर्थ ठरलो नाहीत, असे उपरोधिकपणे म्हणत दिघे साहेब घात झाला. तेही आपल्याच लोकांकडून  असेही यात म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे