शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

स्वत:चे घर नाही, मुलांचे शिक्षणही अद्याप बाकी, मग स्वेच्छानिवृत्ती कशी घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:58 IST

जिल्ह्यात एसटी आठ डेपो आहेत. त्यामध्ये ५० वर्षे वय झालेले  ७५० कर्मचारी, अधिकारी आहेत.  

अजित मांडकेठाणे : राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे, परंतु आधीच पगार कमी, त्यात हक्काचे घर अद्याप नाही, मुलांच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे, पत्नी घरीच असते, असे एक ना, अनेक प्रश्न आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांपुढे उभे ठाकले असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. स्वेच्छानिवृत्ती नको असतानाही जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळे नोकरी गेली, तर घर कसे चालवायचे, असा पेच त्यांच्यापुढे ठाकला आहे.

जिल्ह्यात एसटी आठ डेपो आहेत. त्यामध्ये ५० वर्षे वय झालेले  ७५० कर्मचारी, अधिकारी आहेत.  या सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. एसटीचे पगार कमी, त्यात ते पगारही वेळेत होत नाहीत, भत्ते असून नसल्यासारखे आहेत. पगार दिसताना दिसतो, पण हातात येताना तो कापूनच येतो. त्यामुळे वयाच्या आठ वर्षे आधीच नोकरी सोडावी लागण्याचे दु:ख फार वाईट आहे. माझे वय ५० वर्षे पूर्ण झालेले आहे, मला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करण्यास सांगितले आहे. माझी इच्छा नाही, नोकरी सोडण्याचे कारण नाही. घरात मीच कमावता आहे, पत्नीचे वय झाले आहे. साधे हक्काचे घरही नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर हातात १५ ते २० लाखांच्या आसपास रक्कम पडणार आहे. ती कर्ज फेडण्यातच जाणार आहे. पुढील आयुष्य कसे जगायचे, आजारपण आले, तर त्यासाठी खर्च कुठून करायचा, मुलाचे शिक्षण झाल्यावर त्याचे लग्न कसे करायचे, असे अनेक प्रश्न आमच्यापुढे आहेत. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी, अधिकाऱ्यांपुढे हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही करतो, असे ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्याने सांगितले. 

हप्ते फेडायचा पेचभाड्याच्या घरात वास्तव्य असून, १० हजारांचे भाडे भरावे लागत आहे. माझा मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यासाठी सुमारे ८ लाखांचे कर्ज काढले आहे. तसेच गावातील कामांसाठी काही कर्ज काढलेले आहे. त्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे?    - एसटी कर्मचारी, ठाणे विभाग

घर कसे चालवायचे?घरात कमवते हे एकटेच आहेत, त्यामुळे घराचा सारा भार त्यांच्यावर आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर मिळणाऱ्या पैशातून केवळ कर्जाचीच परतफेड होणार आहे, पण पुढे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न आहेच.           - एसटी कर्मचाऱ्याची पत्नी 

टॅग्स :thaneठाणे