शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

केवळ कल्याणच नव्हे, तर ठाणेही आमचेच; मेळाव्यात भाजप नेत्यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 10:55 IST

मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ठाण्यात मेळावा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र विद्यमान खासदार यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी आक्रमक  भूमिका घेत कल्याणच नव्हे तर ठाणेही भाजपचेच आहे, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला.

यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिर, ३७० कलम हटवण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सेवा, सुशासन व गरीब कल्याणावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. माेदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या  योजनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने भाजपने रविवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मेळावा घेतला.  यावेळी महाजन बोलत होते.  दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आ. गणेश नाईक, मंदा म्हात्रे, गीता जैन, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

भाजपच्या मदतीनेच निवडून याल

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा वल्गना करण्याऐवजी त्यांच्या योजना राबवा, असा टोला  आ. संजय केळकर यांनी खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून येऊ शकणार नाही, असा दावाही केळकर यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना