शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध

ठाणे : रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध आणखीनच पेटले आहे. आपण ठाणेकरांचे नोकरदार आहोत, हे आयुक्त विसरले असून, ते हुकमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी केला. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी, असे ठणकावत यापुढे जर अपमान केला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन, असा इशाराही त्यांनी दिला.मंगळवारी महासभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांच्या तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करून बुधवारी पुन्हा बोलावली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी तिला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ती काही काळासाठी तहकूब केली. एकीकडे महासभा सुरू असतानाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाºयांची बैठक बोलावली. मार्चअखेरच्या कामांमध्ये अधिकारी व्यस्त असून, काही विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत, अशी सबब प्रशासनाने दिली. त्यामुळे आता महासभा केव्हा बोलवायची हे मी ठरविणार असल्याचे महापौरांनी प्रशासनाला सुनावले.आता तर त्यापुढे जाऊन महापौरांनी आयुक्तांवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला. जे सरकारी नोकर आहेत, ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरासमोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा, असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले.नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपस्थित राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत. मात्र, वर्तणूक सुधारली नाही, तर ते मी वापरू शकते. सभागृहात हक्कभंगही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उद्ध्वस्त करून शहर स्मार्ट कशी होणार? असे प्रश्न करून महापौरांनी आयुक्तावर तोफ डागली. ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्ध्वस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते, अशी चिथावणीखोर भूमिका महापौरांनी घेतली.